• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ७४

यशवंतराव व भाऊराव एक झाले त्यावेळचा काळ शे. का. प. संपण्यात जमा होण्याचा जवळ जवळ होता. फार काय शे. का. प. चे अनेक पुढारी यशवंतरावानी मुत्सद्दीपणाने काँग्रेसमध्ये घेतले. त्यांना मंत्री वगैरे केले. यशवंतरावानी महाराष्ट्र काँग्रेस देव-देवगिरीकरांच्या कडून स्वत: काबीज पूर्णपणे केली व “काँग्रेस कबज्यात घ्या” व तिच्यामार्फत राष्ट्रीय प्रवाहाच्याद्वारे बहुनहित साधा” हा जो कर्मवीर शिंद्यांचा सल्ला होता, तो यशवंतरावांनी कार्यवाहित आणिला, ना. खेर व कर्मवीर पाटील यांच्यात १९४८ साली गांदीवधोत्तर जे युद्ध झाले, त्यावेळी खेर यांच्या विरूद्ध उघडपणे यशवंतरावांनी पवित्रा घेतला नव्हता. पण महाराष्ट्र राज्य स्वतंत्रपमे निर्माण झाल्यानंतर व विशेषत: सिंहगडी शिवाजी पुतळ्याची उभारणी झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस ही यशवंतरावांच्या पूर्ण कबज्यात गेली. १९६२ पासून त्यांनी पंचायत राज्याचा प्रयोग महाराष्ट्रात चालू केला. यामुळेही बहुजनाकडे सत्ता गेली. यशवंतराव हे विठ्ठल रामजींचे, सांप्रदायिक अनुयायी नव्हते. शिंदे अध्यामिक होते, असे कृष्णाकाठात त्यांनीच लिहिले होते. पण महाराष्ट्र काँग्रेस कबज्यात घेऊन बहुजनसाजाचे तिच्याच मार्फत येथे राज्य निर्माण करण्याचे विठ्ठलराव शिंदे यांचे स्वप्न यशवंतरावानी पूर्ण केले आजही महाराष्ट्रातील सत्ता व जनता काँग्रेसच्या पाठीमागे आहे. १९३० साली स्वत: प्रथम कर्मवीर शिंदे खुद्द तुरूंगात गेले. नंतर जेधे-जवळकर-बागल-मोरे वगैरे असंख्य लहान मोठ्यांनी त्यांना अनुसरले. शिंदे १९०६ सालापासून अस्पृश्यता निवारण्याचे कार्य करीत होते. पण त्यांची प्रख्याती व कीर्ती त्यांनी जो सत्याग्रहात भाग घेतला त्यामुळे वर्धमान झाली. शिंदे व जेधे यांचा उल्लेख कृष्णाकाठात आहेच. अस्पृश्यता निवारणाच्या गांधी हरिजन चळवळीत यशवंतरावानी क-हाडला महर्षि शिंदे यांना व्याख्यानास त्यांच्या घरी आणिले होते. यासंबंधीचे वर्णन दिले आहे. यशवंतराव पुढे उत्तरोत्तर जन्मभर राजकारणात गुंतले होते, हे खरे. पण त्यांच्यावर जो हा अस्पृश्यता निवारक संस्कार झाला तो वर्धमानच राहिला. १९१७ साली काँग्रेसमध्ये प्रथम अस्पृश्यता निवारणाचा ठराव शिंद्यांच्याच प्रयत्नाने पास झाला होता. नंतर म. गांधी यांनी काँग्रेसच्या चवदा कलमी कार्यक्रमात अस्पृश्यता निवारणाला स्थान दिले. याचवेली स्त्रीसुधारणा व कामगारांचा प्रश्न हेही विषय काँग्रेसमध्ये प्रथम समावेशित झाले. काँग्रेस फक्त राजकीय प्रश्नावर जास्ती चर्चा करी, स्वराज्याची मागणी केली जाई, पण वरील ह्या दोन तीन ठरावामुळे काँग्रेसचा समाजसुधारणाविषयक दृष्टीकोन स्पष्ट झाला. चव्हाण यांच्या मनात म. गांधी यांच्याबद्दल लहानपणापासून शेवटपर्यंत आदर होता. १९३२ साली पुणे करार होते वेळी डॉ. आंबेडकर व म. गांधी यांचे मतभेद राऊंड टेबल कॉन्फरन्स पुढे विलायतेत देखील झाले. पुणे कराराच्या वेळी तर गांधींना स्वतंत्र मतदार संघाची मागणी रद्द व्हावी म्हणून प्राणंतिक प्रायोपवेशन करावे लागले. पुणे करारामुळे डॉ. आंबेडकर व म. गांधी यांचा समझोता होऊन राखीव जागांचे तत्व स्वीकारण्यात आले. पुढे १९३५/३६ पर्यंत जवळ जवळ हरिजन चळवळ देशभर चालली. याकाळात यशवंतराव विद्यार्थी होते. त्यांच्यावर म. गांधी यांच्या समाजकारणाचा प्रभाव प्रत्यक्षाप्रत्यक्ष झाला असणे अशक्य नव्हते. हरीजन चळवळ ही भारतभर गाजलेली चळवळ होती. चार पाच वर्षे ती लोकासमोर होती. १९३९/४० सालात दुसरे महायुद्ध चालू झाले व पुढील काळ सर्व राजकारणाचाच जास्ती होता. १९४२ सालात सातार जिल्ह्यात क्रांतीवीर नाना पाटील यशवंतराव आदिकरून भूमिगतांची चळवळ सुरू झाली व स्वातंत्र्य येईपर्यंत ही दिल्लीपर्यंत फार काय विलायतेतही गाजली. ‘यशवंतराव व सामाजिक सुधारणा’ हा विषय येथे आहे. महर्षि शिंदे यांना सांप्रदायिक अनुयायी मिळाले नाहीत. ते उपेक्षितच राहिले. पण त्यांचा अस्पृश्यता निवारणाचा राष्ट्रीय महत्त्वाचा मुद्दा काँग्रेसने घेतला. खुद्द यशवंतरावानी दलितांचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा त्यांचा विषय केला. यशवंतराव हिंदुत्ववादांच्या प्रवाहात गेले नाहीत. निधर्मी लोकशाहीचे ते प्रवक्ते व पुढारी होते. सावरकरांच्या पासून यशवंतराव दूरच राहिले.