• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

साहेब यशवंतरावजी चव्हाण-२१

तासगावला तर, आम्ही नवे न्यायाधीश, महसूल- अधिकारी निकम यांनी आधी गांधी टोपी घातली (सौम्य हशा), आणि मग, मामलेदार कचेरीवर तिरंगी झेंडा फडकावला.

(‘महात्मा गांधी की जय,’ ‘भारतमाता की जय’ ह्या घोषणा ऐकू येतात)
जन- आंदोलनाच्या ह्या यशानं चिडून जाऊन ब्रिटिशांनी वडूज आणि इस्लामपूरच्या मोर्चांवर अमानुष गोळीबार केला:

८ ठार, ३३ जखमी! 

हे सगळे मोर्चे म्हणजे ४२ च्या आंदोलनाच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे, सोनेरी पान...

(उसासून) इस्लामपूरच्या मोर्च्यात बळी पडलेले इंजिनियर पंडया-सदाशिव पेंढरकरचा मित्र... मूळचा उत्तर प्रदेशातला,
शरीरानं बलदंड, बुध्दिमान, देशभक्त- म्हणाला,

“मला एकदा पहायचंय्- तुमच्या महाराष्ट्रात जनतेची चळवळशी चालते ती!...
प्रत्यक्ष भाग घेतल्याशिवाय कळणार नाही.” तरूण पत्नी घरात ठेवून,
हा तरूण इंजिनियर इस्लामपूरला गेला, आणि परत आलाच नाही...
मी त्याला परावृत्त करू शकलो नाही, यांच मला फार वाईट वाटलं.
(आवेशानं) “आता अशी आपली माणसं बळी जाऊ द्यायची नाहीत!”
“युध्द- साहित्य नेणा-या गाडया उडवा-“

“रेल्वे-स्टेशनं, पोस्ट-ऑफिसं जाळा-पोळा!”
“स्वसंरक्षणासाठी हत्यारसुद्धा वापरायला हरकत नाही-“
“सरकारी कारभार-यंत्रणा खिळखिळी करा!”
“एका यशवंतरावाला अटक झाली, तरी सगळा सातारा यशवंतरावमय झालाय्-“
असाच सूर रेठरे-बुद्रुकच्या शरदराव ढवळयांच्या मळयातल्या बैठकीत दिसून आला.
(वेगानं) किसनरावांना अटक झाली, पण ते छत्रूसिंग, पांडू मास्तर, बलदेवप्रसाद-
अशा सगळया सहका-यांसह जेल फोडून बाहेर आले...
२\२|| महिने पध्दतशीर बांधणी झाल्यानं, सातारा पेटून उठला होता.
 क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड, वसंतराव पाटील, बरडे गुरूजी, नागनाथ अण्णा नायकवडी-
असे नवे धाडसी कार्यकर्ते लढयाच्या आखाडयात उतरले होते!
मला पकडून देणाराला १०००\-  रूपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं ब्रिटिशांनी-
(अभिमानानं आणि आवेगानं)
-सदाशिव पेंढरकरनं शिरवडयाचं स्टेशन जाळलं, आणि पोलिसांच्या बंदुकाच पळवल्या;
-माधवराव जाधवांनी भर दिवसा कराड पोस्टाचं सामान पळवलं;
-लक्ष्मणराव कासेगावकर, वैद्य-अत्यंत निधडया छातीचा, आमच्या कृष्णा-कोयनेच्या आषाढृ-श्रावणातला
महापूर ऐलतीर-पैलतीर पोहून जाणारा पठ्ठा- (शांतपणे) उद्योगपती व्यंकटराव ओगले यांच्या घरी मुक्कामाला होतो.
विमनस्कस्थितीत तेव्हा मी काही काळ सिगरेट ओढू लागलो होतो. (झुरकामारल्याचा अभिनय)...
इतक्यात, निरोप आला: “एक बंदूकधारी इसम तुम्हाला भेटायला आलाय्-“ “येऊ द्या!”
मी सिगरेट फेकली आणि पाह्यलं, तर- कुंडलचे रामूमामा पवार!
रात्रीच्या वेळी रस्ता चुकून ते ओगलेवाडीला आले होते- मी रामूमामांना मिठीच मारली!
किती किती नावं सांगू? व्यंकटराव माने तर वाघ होते, वाघ!
पोलिसांनी चिडून कराड तालुक्यात थैमान मांडलं- कराड शहरात रहाणं अशक्य झालं,
तेव्हा मी मसूर- खराडे गावच्या हद्दीत, दत्तोबा आणि पार्वतीबाई काटकरांच्या जोंधळयाच्या पिकात एक छोटीशी झोपडी बांधून राह्यलो. तिथंच माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा होत असत... भूमिगत अवस्थेत कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला,
तर चळवळ बंद पडली, असा त्यांचा गैरसमज होतो; म्हणून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अशा चर्चा आवश्यक असतात- आणखी एक सांगतो:

‘भूमीगत संघटना लोकजीवनाशी समरस झालेली असली, तरी तिचा पाडाव शासन-यंत्रणा कधीही करू शकत नाही- कधीही नाही!’