खंर तर,
उच्च शिक्षण घ्यायजोगी आमची सांपात्तिक स्थिती नव्हती.
तरीदेखील, मी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झालो...
प्राचार्य बाळकृष्ण- वृत्तीनं राष्ट्रीय,
इतिहासाचे विदवान प्राध्यापक, कुशल कारभारपटू,
आणि चांगले वक्ते होते!
कादंबरीकार ना. सी. फडके आम्हाला तर्कशास्त्र शिकवायचे.
‘दौलत,’ ‘जादूगार’ ह्या गाजलेल्या कादंब-यांचे जनक!
विषय सोपा आणि मनोरंजक करण्यात,
ते वाकबार होते!
एखादी गाण्याची मैफल जमावी,
तसे त्यांचे तर्कशास्त्राचे तास जमून येत!!
एकीकडे शैक्षणिक, सांस्कृतिकष्ट्या
मी माझं मन असं संपन्न करीत असतानाच,
गांधीजींचा ‘हरिजन’ नित्यनेमानं वाचीत असे...
अहो, धरून येणा-या पत्रासारखी,
मी ‘हरिजन’ च्या ताज्या अंकाची आतुरतेनं वाट पहात असे!
गांधीजींचे सरळ, साध्या, सोप्या इंग्रजीतले
गंभीर विचार वाचून,
मनाला एक प्रकारची शक्ती मिळत असे...
ते आमचं बौध्दिक ‘टॉनिक’ होतं, ‘टॉनिक’!
कॉंग्रेस हाच आपला राजकीय पक्ष,
असं मी तेव्हाच मनोमन ठरवलं...
१९३४ च्या कॉंग्रेस अधिवेशनाला गेलो असताना,
मुंबईत मी साने गुरूजींना प्रथम पाह्यलं.
अहो, मुंबईसुद्धा मी प्रथमच पहात होतो!
गुरूजी गुडघे पोटाशी घेऊन
एकटेच चटईवर चिंतन करीत बसले होते.
माझी माहिती दिल्यावर, ते म्हणाले,
“छान, फाऽऽर छान!
कॉंऽऽग्रेसला अशाऽकाऽर्यकर्त्यांऽऽफाऽऽर फाऽऽर गरज आहे!... ये हो बाऽऽळ!!
३५ सालच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये,
मी टॉयफॉईडंन आजारी पडलो...
तरीही, प्राचार्य बाळकृष्णांनी
आपले खास अधिकार वापरून
ती ‘टर्म’ मला दिली. आणि, तुम्हाला सांगतो:
माझी स्वत: चीदेखील अपेक्षा नसताना,
मी ‘इंटर’ पास झालो!
मी ज्युनियर बी. ए ला असतानाच,
३६ साली ‘प्रतिक’ च्या निवडणुका आल्या- आम्ही नव्या कार्यर्त्यांनी
सातारला आत्मारामबापू पाटील, यांच्या नावाचा आग्रह धरला-
(आवेशान) असा शेतक-यांचा तरूण आणि तडफदार
प्रतिनिधि कायदेमंडळात जाणं आवश्यक होतं !
सातारचे पुढारी भाऊसाहेब सोमण
यांच्याशी बोलूनच आम्ही थांबलो नाही,
तर थेट मुंबईला जाऊन सरदार वल्लभभाई पटेल
यांची पण भेट घेतली!
त्यांचे चिरंजीव, डाह्याभाई पटेल, यांनी अडवलं: