• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -६७

मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी कृष्णा खोरो विकास मंडळ, उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, झोपडपट्टीवासियांना मोफत घर योजना, धारावी स्लमचे स्वच्छीकरण, टॅंकरमुक्त चळवळ, एका रुपयात झुणकाभाकर, सुलभ स्वच्छतागृहे, जागोजागी क्रीडाप्रबोधिनींची स्थापना, ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात सवलती, मातोश्री वृध्दाश्रम, महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक संवर्धन अशी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांनी जागतिक मराठी परिषदेची स्थापना करून जगातील सर्व मराठी लोकांच्या औद्योगिक व सांस्कृतिक विकासाचे ध्येय मराठी समाजापुढे ठेवले. मराठी उद्योजकांना प्रेरणा देण्याकरता त्यांनी जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲ इंडस्ट्रीजची स्थापना केली. जागतिक मराठी सभेचे अधिवेशन (८९, ९१ व ९४ साली) तीन वेळा भरविले. सिध्दी प्रेरणा शिबिराचे आयोजन केले. मराठी व्यापार उद्योग मेळावा भरविला. मराठी ग्रंथसंग्रहालयाला ५० लाख रुपयांची देणगी दिली. अर्थात देणगी दिल्यानंतर ती प्रत्यक्ष संस्थेपर्यंत पोहोचण्यास बराच काळ लागला ही गोष्ट वेगळी.

सन २००० पर्यंत सर्व महाराष्ट्र साक्षर झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. शारीरिक शिक्षणाला उत्तेजन देण्याकरता त्यांनी स्मार्ट स्पोर्टसची योजना सुरू केली. त्यांना खेळाची, विशेषतः क्रिकेटची आवड आहे. काही काळ ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. ३० जानेवारी १९९९ साली बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आज्ञेमुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

लोकसभेचे सदस्यत्व व मध्यवर्ती सरकारात मंत्री

१९९९ साली मनोहरपंत दादर मतदार संघातून लोकसभेवर निवडून आले. ते अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री झाले. (३०-१०-९९). नव्या उद्योगांना उत्तेजन देणे व आजारी उद्योगांना मदत करणे हे त्यांचे प्रामुख्याने धोरण होते. १४-९-९५ ते जानेवारी १९९९ ह्या काळात ते मुख्यमंत्री होते. पुढे ते कॅबिनेट मंत्री झाले व नंतर ते लोकसभेचे अध्यक्ष झाले.

मनोहरपंतांचे व्यक्तिमत्व

मनोहर जोशी ह्यांचे भवितव्य लोकाभिमुख कार्यावरच अवलंबून आहे. ते प्रत्येकाविषयी आपुलकी दाखवतात. त्यांची दृष्टी सकारात्मक असते, परंतु परिणाम अनिश्चित. ते सगळ्यांना होय म्हणतात. करून टाकू हा त्यांचा परवलीचा शब्द. बोलण्यास गोड व्यक्तिमत्व. प्रसन्न, हसरे, ध्येयवादी, कष्टाळू, बाहेरून नम्रता, शालीनता, सुसंस्कृतपणा, मुत्सद्दीपणा आणि माणसाची उत्तम पारख हे त्यांचे गुण आहेत.

संदर्भसूचीः
१)    चौगुले श्रीकांत – मनोहर जोशी, २००२, अविष्कार प्रकाशन
२)    मेहेंदळे विश्वास – गांधी ते पटेल, सिग्नेट पब्लिकेशन, पा. २७.
३)    टेणी नंदकुमार – नांदवी ते वर्षा, १९९७, प्रभात प्रकाशन घाटकोपर