• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -२

लेखकांचे दोन शब्द

गेली दोन वर्षं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या विषयावर आम्ही लिखाण करीत आहोत. अर्थात त्याचा हेतू प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीचे विश्लेषण करून त्याचा क्रमांक लावायचा हा नाही. परिचयात्मक चरित्रे लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे व महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांची चरित्रे एका ठिकाणी वाचावयास मिळावी हा प्रमुख व मर्यादित हेतू हे पुस्तक लिहिण्यात आहे. तसा ग्रंथ मराठीत व इतर कोणत्याही भाषेत असलाच तर आम्हाला माहीत नाही. अर्थात प्रत्येक मुख्यमंत्र्याची वेगळी चरित्रे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तेरा मंत्र्यांच्या चरित्रांची तेरा पुस्तकांची एक मालिका प्रसिध्द झालेली आहे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानेही काही मुख्यमंत्र्यांची चरित्रे लिहून घेतली आहेत. ह्या सर्व ग्रंथांचा हे पुस्तक लिहिताना आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांचे ऋण आम्ही त्या त्या प्रकरणाच्या शेवटी नोंद केले आहे. विशेषतः श्री. श्रीकांत चौगुले, श्री. सोपान गाडे, श्री. बोडदे अण्णा यांचे आम्ही ऋणी आहोत. त्याचप्रमाणे लोकराज्य, महाराष्ट्र शासनाचे मध्यवर्ती ग्रंथालय, शासनाचेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय ह्यांनीही संदर्भ पुरविण्यात आम्हाला मोठी मदत केली.

हे पुस्तक लिहिताना आम्हाला आमच्या मित्रमंडळींचीही खूप मदत झाली. सुदैवाने आम्हाला व्यासंगी समीक्षक डॉ. य. दि. फडके ह्यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. अरविंद टिकेकर – माजी ग्रंथपाल मुंबई विद्यापीठ, श्री. शरदजी काळे – संचालक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, श्री. गावडे – संचालक महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्था, श्री. भिरुड, श्री. माने, श्री. कृष्णकांत देसाई (एशियाटिक ग्रंथालय), डॉ. अरुण टिकेकर – माजी संपादक लोकसत्ता, ह्या सर्वांनी संदर्भ ग्रंथ पुरवून आम्हाला मोठी मदत केली आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक पूर्ण झाले नसते. त्या सर्वांनी ही मदत कर्तव्यबुध्दीने केलेली असल्यामुळे त्यांना धन्यवाद देऊन आम्ही त्यांच्या योगदानाचे अवमूल्यन करीत नाही. आमचे स्नेही श्री. भाऊसाहेब मुजुमदार, श्री. अच्युत धायगुडे ह्यांनी हस्तलिखित वाचून आम्हाला बहुमोल सूचना केल्या. पुस्तकाचे मुद्रण अतिशय सुबक रीतीने केल्याबद्दल श्री. विश्राम शिरवाडकर यांचेही आभार.