• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -१४

श्री. बाळासाहेबांना ग्रंथ व ग्रंथालय ह्या विषयात रस होता. त्यांनी ग्रंथालय हा विषय गृहखात्यातून शिक्षणखात्यात अंतर्भूत केला. बॅ. फैझी ह्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय विकास समिती नेमली. त्याचबरोबर आकाशवाणीवर स्त्रीशिक्षणाविषयी व्याख्याने सुरू केली.

गरिबांना कायद्याचा सल्ला मिळावा म्हणून त्यांनी लीगल एड सोसायटी स्थापन केली. त्यांच्याच मंत्रिमंडळाने श्री. मुन्शी गृहमंत्री असताना सार्जंट ह्या नामाभिधानाऐवजी इन्स्पेक्टर ही उपाधी आणली. श्री. बाळासाहेबांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत टेलिग्राफ ऑफिसकरता क्रास मैदानावर जागा मिळाली.

त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत मुंबई गिरणी कामगाराचा ७ नोव्हेंबर १९३८ रोजी एका दिवसाचा संप झाला.

बाळासाहेब विद्यापीठ मतदार संघातून दोनदा निवडून आले (१९३७।१९४६). मंत्री असताना त्यांनी आपल्या फर्मला कोणतेही शासकीय काम दिले नाही. गव्हर्नर लॉर्ड ब्रेबर्न ह्यांच्याशी व त्यानंतर आलेले लम्ले ह्यांचेशीही त्यांचे संबंध स्नेहपूर्वक होते.

चले जाव चळवळ

सप्टेंबर १९३९ साली दुसरे महायुध्द सुरू झाले. इंग्रजांचा लढा हा लोकशाहीकरता आहे म्हणून त्यांनी भारताला लोकशाही दिली, तर युध्दकार्यात सहकार्य मिळेल अशी कॉंग्रेसने भूमिका घेतली आणि भारताची स्वतंत्र घटना तयार करण्याचा अधिकार मान्य करावा अशी मागणी केली . परंतु ह्या अटी ब्रिटिश सरकारने मान्य केल्या नाहीत. बारा प्रांतातील कॉंग्रेस मंत्रिमंडळांनी ३१ ऑक्टोबर १९३९ रोजी राजिनामे दिले.

त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या. गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह व त्यानंतर चले जाव चळवळ सुरू केली. राजकीय पुढा-यांची धरपकड झाली. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील भारतीयांनी राजिनामे दिले. वाटाघाटीकरता क्रिप्स आले. परंतु तडजोड झाली नाही. ऑगस्ट १९४२ च्या चले जाव चळवळीत बाळासाहेबांना अटक होऊन त्यांची १९४४ला सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर बाळासाहेबांनी विधायक कार्याला वाहून घेतले. ह्याच काळात कोरा केंद्राची स्थापना झाली.