• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -१०

मुंबई इलाख्यात कॉंग्रेसने सत्ताग्रहण करण्यास नकार दिल्यामुळे त्यावेळचे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबर्न ह्यांनी श्री. धनजी शा. कूपर ह्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ नेमले. ह्या मंत्रिमंडळातील नेत्याला प्रिमिअर म्हणजे पंतप्रधान ही संज्ञा होती. पुढे १९५० सालच्या घटना कायद्यामुळे त्याचे नामांतर मुख्यमंत्री झाले. साहजिकच १९३५ कायद्यानुसार श्री. धनजी शा. कूपर हे पहिले मुख्यमंत्री. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या लिखाणाची सुरुवात श्री. धनजी शा. कूपर ह्यांच्यापासून केली आहे.

अर्थात कूपर मंत्रिमंडळ फक्त सहा महिने टिकले. ह्या मंत्रिमंडळाचे चरणसिंग मंत्रिमंडळाशी साम्य आहे. कारण ह्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत विधिमंडळाचे एकही अधिवेशन बोलावले नव्हते. ह्या मंत्रिमंडळाला जनादेश नव्हता. त्याचे कायदेमंडळात बहुमत नव्हते.

श्री. धनजी शा. कूपर हे पारशी गृहस्थ उद्योजक होते. किर्लोस्करांच्या प्रमाणे त्यांचा नांगरांचा कारखाना होता. साता-यास ते एक बडे प्रस्थ होते. ते ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते आणि ब्रिटिश साम्राज्यधार्जिणे होते. त्यांचा कॉंग्रेस व तिची राष्ट्रीय चळवळ ह्यांना सातत्याने विरोध होता. काही काळ श्री. कूपर ह्यांनी साता-यास स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता गाजविली होती. अर्थात ह्या सहा महिन्याच्या काळात श्री. कूपर ह्यांच्याकडून कोणत्याही कामगिरीची अपेक्षा करणे न्याय्य ठरणार नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटका

त्यांच्या कारकिर्दीत एकच सांगण्यासारखी गोष्ट झाली. ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची नजरबंदीतून झालेली सुटका. अंदमानातून सुटल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीला स्थानबध्द केले होते. अर्थात त्यांच्यावर ह्या काळातही राजकीय चळवळीत भाग घेण्यास बंदी होती. परंतु ह्या स्थानबध्दतेच्या काळात त्यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. किर्लोस्कर मासिकात त्यांनी अनेक विचार प्रवर्तक लेख लिहिले आणि जनजागृतीचे प्रभावी कार्य केले.

अर्थात ही सुटका करण्यात बॅ. जमनादास मेहता ह्यांचा सिंहाचा वाटा होता. बॅ. जमनादास मेहता प्रथम कॉंग्रेसमध्ये होते व त्यानंतर त्यांनी हिंदु महासभेत प्रवेश घेतला. ते एक प्रभावी वक्ते होते. बॅ. सावरकरांच्या वरील निर्बंध उठल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष राजकारणात भाग घेता येऊ लागला. ते हिंदु महासभेचे सक्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्यातच पतितपावन मंदिर बांधले गेले.

एक अर्थाने १९३५ नंतरच्या काळात श्री. कूपर ह्यांना आपले पहिले मुख्यमंत्री संबोधणे संयुक्तिक ठरेल. अर्थात ते स्वातंत्र्यपूर्व व प्रांतिक स्वायत्ततेच्या काळात.