• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-ते तुम्हाला नाही कळायचं !

ते तुम्हाला नाही कळायचं !   

गुरूजनांविषयी यशवंतरावांच्या मनात अपार आदर होता. केंद्रीय मंत्री असताना ते एकदा विश्रांतीसाठी कराडला आले होते. कराडमधीलच एका मित्राच्या घरी माडीवर राजकीय चर्चा करीत बसले होते. त्यावेळी यशवंतराव सिगारेट ओढीत असत. गप्पांच्या ओघीत त्यांनी सिगारेट पेटविली. तक्क्याला टेकून त्यांनी एक झुरका मारला. इतक्यात एक माणूस निरोप घेऊन आला, ' खाली जोशी म्हणून कोणी एक माणूस आलाय, साहेबांना भेटायचं म्हणतोय.'

' त्यांना वर पाठव ' , यशवंतराव म्हणाले. थोड्याच वेळात एक गृहस्थ माडीवर आले. त्यांना पाहताच साहेबांनी ताबडतोब हातातील सिगारेट तक्क्यामागील भिंतीवर दाबून, विझवून टाकून दिली. भेटीला आलेले गृहस्थ यशवंतरावांचे गुरूजी होते. यशवंतरावांनी त्यांना आदराने नमस्कार केला व काम विचारले. गुरूजींनी आपली समस्या मांडली. यशवंतरावांनी काम करण्याचे वचन दिले. चहा घेऊन गुरूजी निघून गेले. गुरूजींना पाहिल्यावर सिगारेट विझविण्याची यशवंतरावांची धडपड त्यांच्या मित्रांनी पाहिली होती. त्यापैकी एक मित्र म्हणाला, ' साहेब, इतक्या गडबडीने सिगारेट विझवायची गरज नव्हती.' त्यावर हसून यशवंतराव म्हणाले, ' ते तुम्हाला नाही कळायचं ! या जोशी गुरूजींनीच माझे कान धरून मला ' ही पूर्व, ही पश्चिम ' अशा दिशा शिकविल्या आहेत. म्हणून तर आज मी समोरच्या माणसाची दिशा अचूक ओळखू शकतो. मित्रांनो, माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याच्या गुरूसमोर त्याने नतमस्तक व्हायलाच पाहिजे.'

संरक्षणमंत्र्यांचे हे सिगारेट प्रकरण त्यानंतर कितीतरी दिवस त्यांच्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय बनले होते.