• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-कुरूप बदकाची गोष्ट !

कुरूप बदकाची गोष्ट !

परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर यशवंतरावांना वारंवार विदेश दौ-यावर जावे लागे. प्रवासाची दगदग सोसवत नसल्यामुळे वेणुताई सहसा त्यांच्याबरोबर जात नसत. वेणूताईंना सोडून परदेशात जाताना यशवंतरावांना अपार वेदना होत, पण त्यांचा नाईलाज होता. अशावेळी मन रिझविण्यासाठी यशवंतराव प्रवासात भरपूर वाचन करीत असत. देशातील रूक्ष राजकीय वातावरणापासून दूर गेल्यावर त्यांचे मन प्रसन्न व्हायचे. यशवंतरावांना मद्याचे किंवा सिगारेटचे व्यसन नव्हते. त्यांच्या गरजा खूपच मर्यादित होत्या. अनावश्यक भेटीगाठी ते शक्ततो टाळत असत. खरेदी करण्याचीही त्यांना हौस नव्हती. त्यांना फक्त दोनच गोष्टी मनापासून आवडायच्या - प्रेक्षणीय स्थळे पाहणे आणि भरपूर वाचन करणे. असेच एकदा ते डेन्मार्क देशाच्या दौ-यावर होते. ओडेन्स या छोट्या गावाजवळून जात असताना त्यांना अचानक हॅन्स ख्रिश्चन अँडरसनची आठवण झाली. लहान मुलांसाठी सोप्या भाषेत आशयगर्भ कथा लिहिणा-या अँडरसनच्या अनेक कथा यशवंतरावांनी वाचल्या होत्या. त्याने लिहिलेली एका कुरूप बदकाची गोष्ट तर त्यांची आवडती कथा होती. प्रतिभावंत मराठी कवी ग. दि. माडगूळकर यांनी या कथेवर आधारित ' तो राजहंस एक ' ही तितकीच सुंदर कविता लिहिली होती.

ओडेन्स गावाजवळून जाताना यशवंतरावांना अँडरसन आठवला, राजहंस आठवला आणि गदिमासुद्धा आठवले. बरोबरच्या लोकांना ते म्हणाले, ' अरे, एका महान लेखकाच्या जन्मभूमीला भेटण्याचा योग आज जुळून आला आहे. तो चुकवून चालणार नाही.' आणि मग त्यांनी ओडेन्स गावाला भेट दिली. अँडरसनने त्याच्या कथांमधून चित्रित केलेला निसर्ग यशवंतरावांनी प्रत्यक्ष पाहिला. त्यांना अपार आनंद झाला.