• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- कसोटीला उतरणारा वक्ता

कसोटीला उतरणारा वक्ता

१९६८ सालची गोष्ट. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे अनंतराव कुलकर्णी यांनी कवी यशवंतांनी लिहिलेले ' छत्रपती शिवराय ' हे महाकाव्य पुण्यात प्रकाशित करायचं ठरवलं. बालगंधर्व रंगमंदिरात यशवंतरावांच्या शुभहस्ते प्रकाशनाचा कार्यक्रम होणार होता. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर व नामांकित वक्ते उपस्थित होते. व्यासपीठावर कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, कवी यशवंत आणि अध्यक्ष म्हणून यशवंतराव बसले होते, तर प्रेक्षकांत पहिल्या रांगेत पु. ल. देशपांडे, ना. सी. फडके, ग. दि. माडगूळकर, द. र. कवठेकर असे भाषाप्रभू बसले होते.

' छत्रपती शिवराय ' या महाकाव्याबद्दल कुसुमाग्रज फारच छान बोलले. त्याअगोदर वि. स. खांडेकरांचेही अत्यंत दुर्मिळ संदर्भ देणारं रंगतदार भाषण झालं होतं. शेवटी अध्यक्ष म्हणून यशवंतराव काय बोलतात याची उत्सुकता श्रोत्यांमध्ये शिगेला पोचली. एका अर्थाने ती यशवंतरावांच्या वक्तृत्वाची कसोटीच होती.

यशवंतराव बोलायला उठले. सभागृहात स्तब्धता पसरली. नेहमीचे सर्व प्रास्ताविक आपल्या ऐटदार ढंगात करून यशवंतराव म्हणाले, ' मैतरणी बिगी बिगी चाल ' असं म्हणत महाराष्ट्राच्या द-याखो-यात भटकणारे रांगडे कवी यशवंत, आज शिवप्रभूंच्यावर हे समर्थ महाकाव्य रचून महाकवींच्या दालनात जाऊन बसलेत, याचा त्यांचा एक चाहता म्हणून मला अतिशय आनंद होत आहे.'

त्यांच्या या सहज, रास्त व पल्लेदार वाक्याने सलामीलाच टाळ्या घेतल्या. ती सुरुवातच अगदी अनपेक्षित होती. ' न्याहरीचा वकुत व्हईल, मैतरणी बिगी बिगी चाल ' या कवी यशवंतांच्याच एका गाजलेल्या जुन्या गीताची आठवण त्यांनी रसिकांना करून दिली व श्रोत्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद लाभला. आपल्या जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या गीताचा एवढा वाजवी व रोकडा प्रत्यय प्रत्यक्ष यशवंतरावांनी दिलेला पाहून कवी यशवंतांनी सदगदित होऊन चष्मा काढून आपले डोळे पुसले. यशवंतरावांनी ती कसोटीची सभा सहज जिंकली.