• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-हजरजबाबी यशवंतराव

हजरजबाबी यशवंतराव

इंग्रजी पाचवी- सहावीत असताना यशवंताला तमाशा पाहण्याचा छंद जडला. आवडीचा तमाशा पाहण्यासाठी आठ-दहा मैलांचे अंतर तो मित्रांबरोबर चालत जात असे. कराडच्या परिसरातील गावांमध्ये यात्रेदरम्यान होणारे तमाशांचे फड तो आवर्जून पहात असे. शाळेतील संमेलनाच्या निमित्ताने एकदा बर्नार्ड शॉ च्या ' डॉक्टर्स डिलेमा ' या नाटकातील एका प्रवेशात यशवंताने काम केले होते. त्या निमित्ताने त्याची बर्नार्ड शॉ या नावाशी ओळख झाली होती.

एकेदिवशी कराडजवळच्या एका गावात एक नामांकित तमाशा होणार होता. यशवंता आपल्या चार-पाच मित्रांसह संध्याकाळी त्या गावाकडे जायला निघाला. कृष्णा नदीवरील पूल ओलांडून काही अंतर पुढे गेल्यावर अचानक त्यांच्या शाळेचे शिस्तप्रिय क्रीडाशिक्षक समोरून येताना दिसले. सगळेजण मनातून धास्तावले. त्या शिक्षकांनी ' कुठे चाललात ?' असे विचारले तर काय सांगायचे असा प्रश्न सर्वांना पडला. खरे सांगून जमणार नव्हते व खोटे काही सुचत नव्हते. इतक्यात यशवंताला एक कल्पना सुचली. तो बरोबरच्या मित्रांना म्हणाला, ' मास्तरांशी खरे बोलता आले नाही तरी खोटे नक्कीच बोलायचे नाही.' यशवंताला वाटले होते तसेच झाले. मुलांना पाहिल्यावर क्रीडाशिक्षकांनी विचारले, ' कोठे चाललात रे, एवढ्या संध्याकाळी ?'

यशवंता पुढे होऊन म्हणाला, ' आम्ही स्टेशनवर चाललो आहोत. तेथे टॉम शॉ येणार आहे. त्यांना बघायला आम्ही चाललो आहोत.'

' हा कोण टॉम शॉ ?'

' हा बर्नार्ड शॉ चा छोटा भाऊ आहे.'

मास्तरांना हे उत्तर पटले. ते म्हणाले, ' जा, जा, चांगले आहे. ' पुढे निघून गेल्यावर हसून हसून मुलांची मुरकुंडी वळली.

भावी आयुष्यात गंभीर व मितभाषी म्हणून ओळखले गेलेले यशवंतराव लहानपणी किती मिश्कील होते हे या घटनेवरून दिसून येते.