• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-'पैजेचा रुपाया !

पैजेचा रुपाया !

उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांगितलेली ही आठवण . एकदा ते दिल्लीत यशवंतरावांच्या घरी त्यांना भेटायला गेले. किर्लोस्कर त्यावेळी नुकतेच अमेरिकेतून आले होते. अमेरिकेत तेव्हा अध्यक्षीय निवडणुकीची धामधुम सुरू होती. यशवंतराव तेव्हा परराष्ट्रमंत्री होते आणि इतर देशातील घडामोडींविषयी माहिती जाणून घ्यायला ते नेहमीच उत्सुक असत. ते किर्लोस्करांना म्हणाले, ' शंतनुराव, या निवडणुकीत निक्सन पडणार, असं माझं मत आहे.'

किर्लोस्कर म्हणाले, ' तुमचा अंदाज जर भारत सरकारच्या मतावर आधारलेला असेल, तर तो चुकणार.' यावर यशवंतराव म्हणाले, ' तुम्ही सरकारवर नेहमी टीका करता, पण यावेळी निक्सन येणार नाही असं मला वाटतं.' किर्लोस्करांचे असे मत  होते की, निक्सन नक्की निवडून येणार. यशवंतरावांना ते पटेना. शेवटी दोघांमध्ये पैज लागली. निक्सन निवडून आल्यास यशवंतरावांनी किर्लोस्करांना एक रुपाया द्यायचा आणि निक्सनचा पराभव झाला तर किर्लोस्करांनी यशवंतरावांना एक रुपाया द्यायचा असे ठरले. तो विषय तिथेच संपला.

पुढे यथावकाश अमेरिकते अध्यक्षपदाची निवडणूक झाली. निक्सन निवडून आले. किर्लोस्कर पैज जिंकले. या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा किर्लोस्कर पुण्यात होते आणि यशवंतराव दिल्लीत होते. किर्लोस्करांच्या कारखान्याचे काही अधिकारी कामानिमित्त दिल्लीला गेले होते. ते जेव्हा यशवंतरावांना भेटायला गेले, तेव्हा यशवंतरावांनी त्यांच्याबरोबर एक रुपाया पाठवून दिला आणि किर्लोस्करांना एक चिठ्ठी पाठवली त्यात लिहिले, ' निक्सन निवडून आल्यामुळे मी पैज हरलो, त्याचा हा रुपाया.'

खिलाडूवृत्ती आणि दिलेला शब्द पाळण्याची यशवंतरावांची वृत्ती हेच त्यांच्या मोठेपणाचे एक कारण आहे.