• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- तेवढी आपली ऐपत नाही !

तेवढी आपली ऐपत नाही  !

पुरवठा मंत्री झाल्यानंतरही यशवंतरावांची राहणी एकदम साधीच राहिली. त्यांना भपकेबाजपणा मुळीच आवडत नसे. कराडमधील त्यांचे घरसुद्धा अगदी साधे होते.
१९५६ साली मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्यानंतर यशवंतराव काश्मिरच्या छोट्या दौ-यावर गेले होते. तेथून परत आल्यावर त्यांचे मित्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी गप्पा मारत असताना शास्त्रीजींनी सहज विचारले, ' काश्मिरला काय खरेदी केली ?'

यशवंतराव म्हणाले, ' काही विशेष सांगण्यासारखे नाही. केवळ अपवादच सांगायचा तर एक रेशमी पातळ पत्नीला आणले. आक्रोड वृक्षाच्या लाकडाचे नक्षीकाम आणले नाही, कारण ते आणल्यानंतर ठेवायचे कोठे ? आपले कराडचे घर कसे आहे, ते तुम्हाला माहितच आहे त्या नक्षीकामाचा तेथे अपमानच व्हायचा ' थोडे थांबून यशवंतराव पुढे म्हणाले, ' भारी पश्मिना शाल खांद्यावर घेण्याइतकी आपली ऐपत नाही, तिथे बाकीच्या गोष्टी कशा घेणार ? फक्त एवढे खरे की तेथील निसर्गाचे सौंदर्य व पावित्र्य मनात साठवून आणले आहे. '

भौतिक समृद्धीपेक्षा आत्मिक सौंदर्य अधिक श्रेष्ठ असते याची यशवंतरावांना पूर्ण जाणीव होती हेच वरील प्रसंगातून दिसून येते.