• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-सत्ता खाजगी कारणासाठी वापरायची नसते !

सत्ता खाजगी कारणासाठी वापरायची नसते  !

ह. रा. महाजनी हे यशवंतरावांचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार होते. साहेबांवर आणि त्यांच्या राजकीय धोरणांवर अनेकदा ते जाहीर टीका करीत असत. अर्थात यामुळे त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला नाही. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यादरम्यान यशवंतरावांवर चहुबाजूंनी टीकेचा मारा होऊ लागला. जनता आणि पत्रकार साहेबांची भूमिका समजावून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.

एकदा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत ह. रा. महाजनी व यशवंतरावांची भेट झाली. बोलता बोलता साहेब म्हणाले, ' तुम्ही आम्हाला मदत करा. भविष्यात आम्हीही तुम्हाला सहकार्य करू.' महाजनींनी आपल्या दैनिकामधून यशवंतरावांची संयुक्त महाराष्ट्रासंबंधीची भूमिका योग्यप्रकारे मांडावी अशी यशवंतरावांची अपेक्षा होती, पण महाजनींनी ही विनंती धुडकावून लावली आणि नंतरच्या काळात साहेबांवर स्वार्थीपणाचे आरोप करणारे पाच-सहा कठोर अग्रलेख लिहिले. खाजगीतही ते साहेबांवर टीका करीत, पण साहेब शांत होते. एकदा ' महाजनींना क्षमा का करता ?' असे मित्रांनी विचारल्यावर साहेब म्हणाले, ' सत्ता ही खाजगी कारणासाठी वापरायची नसते. सर्वांनीच हे व्रत कायमचे पाळले पाहिजे.'

महाजनींची टीका कमी न होता उलट वाढली, तेव्हा साहेबांनी त्यांना फोन केला व एकच वाक्य उच्चारले , ' तुम्ही आता लढाऊ पवित्रा घेतला आहे.' आणि त्यांनी फोन ठेवला. कितीही राग आला तरी यशवंतरावांनी आपल्या भाषेला असंस्कृतपणाचा स्पर्श होऊ दिला नाही.