• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- दुष्काळात एकसष्ठी नको !

दुष्काळात एकसष्ठी नको  !

सन १९७२ साली महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. या भयाण दुष्काळाशी लढताना शासन आणि जनता मेटाकुटीला आली. पुढची दोन- तीन वर्षे महाराष्ट्रात जगण्यासाठीचा खडतर संघर्ष सुरू होता. अशातच १९७३ साली यशवंतरावांची एकसष्ठी आली. १२ मार्च हा त्यांचा वाढदिवस, ते दिल्लीत गेले तरी महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जात असे.

त्यावर्षी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, ना. शरद पवार आणि महाराष्ट्रातील इतर कार्यकर्त्यांनी ठरविले की यशवंतरावांची एकसष्ठी साजरी करायची. सर्व महाराष्ट्रभर तयारी सुरू झाली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सातारा अशा सर्व जिल्ह्यांमध्ये विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करून प्रबोधन करण्याचे ठरले. ही सगळी तयारी चालू असताना अचानक यशवंतरावांनी दिल्लीतून निरोप पाठवला की, ' महाराष्ट्रावर कधी नव्हे ते भयानक दुष्काळाचे संकट कोसळले आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. रोजगार हमीच्या कामावर मोठमोठे शेतकरी येत आहेत. अनेक गावांमध्ये पाणी नाही, पीक नाही. अशा भयाण दुष्काळामध्ये महाराष्ट्र सरकार आणि जनता होरपळत असताना मी एकसष्ठी साजरी करणे हे नुसते असंवेदनशीलतेचेच नाही, तर क्रूरपणाचे ठरेल. म्हणून माझी एकसष्ठी साजरी करायची नाही.' नेते आणि कार्यकर्त्यांनी यशवंतरावांना परोपरीने विनवणी करून सांगितले की, ' साहेब, हे सर्व आम्ही स्वत: खुशीने करीत आहोत. याच्यामुळे कोणालाही आर्थिक नुकसान आम्ही होऊ देणार नाही. आमची तयारी पूर्ण होत आली आहे.' पण यशवंतरावांनी ऐकले नाही. त्यांनी सगळी तयारी थांबवायला लावली. सगळे कार्यक्रम त्यांनी रद्द केले. कार्यकर्ते हिरमुसले, निराश झाले. पण साहेबांनी आपला निर्णय बदलला नाही.

ज्यांनी महात्मा गांधींना जन्मभर आपला आदर्श मानले, ते साहेब जनता दु:खात असताना स्वत:चा गौरव करून घेणे शक्यच नव्हते.