• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- मनाचा मोठेपणा

मनाचा मोठेपणा

आपल्या विरोधकांविषयी कटू उदगार न काढणे व इतरांना योग्य तो मोठेपणा देणे हे यशवंतरावांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य होते.

लोकनायक डॉ. मा. श्री. अणे हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होते हे सर्वांनाच माहित आहे. डॉ. अणे यांची एखाद्या प्रश्नाबाबतची भूमिका काहीही असली तरी त्यांची श्रेष्ठता वादातीत होती. एकदा लोकनायक अणे यांच्याच गावी वणी येथे साहेबांची सभा होती. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. अणेंचा गौरव केला आणि ' संयुक्त महाराष्ट्राला त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करू ' असे भावपूर्ण उदगार काढले.

असाच आणखी एक प्रसंग. विदर्भ साहित्य संघाचे अधिवेशन बुलढाणा जिल्ह्यातील सावरगाव इथे भरले होते. श्री. ना. रा. शेंडे हे अधिवेशनाचे उदघाटक होते. उदघाटन समारंभाच्या वेळी आयोजक सुरुवातीला यशवंतरावांचा सत्कार करू लागले, तेंव्हा ते आयोजकांना म्हणाले, ' अहो, आज शेंडे यांचा मान व्हावयास पाहिजे, माझा नव्हे.'

लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान जपला गेला पाहिजे ही यशवंतरावांची धारणा होती.