• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- पु. लं. चे भाषण ऐकू द्या !

पु. लं. चे भाषण ऐकू द्या !
 
१९ जानेवारी १९६५ रोजी नांदेडला पाचवे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन आयोजित केले गेले होते. अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे, आणि उदघाटक होते केंद्रीय संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, उदघाटन समारंभासाठी यशवंतराव आणि पु. ल. मंचावर येताच साहेबांच्या सचिवाने आयोजकांच्या कानात सांगितले, ' लवकर आटपा, साहेबांना कंधारला जाऊन तिथल्या कार्यक्रमांना उपस्थित रहायचंय.' बिचारे आयोजक नाराज झाले. त्यांचा हिरमोड झाला. खरं तर त्या संमेलनाच्या उदघाटनासाठीच यशवंतराव खास दिल्लीहून आले होते. त्यांनी उदघाटनाचे सुंदर भाषण केले. त्यानंतर पु. लं. चे अध्यक्षीय भाषण सुरू झाले. ते उत्तरोत्तर रंगत गेले. साहेब तल्लीनतेने भाषण ऐकत होते, इतक्यात त्यांचे सचिव त्यांच्याजवळ जाऊन हळूच म्हणाले, ' आपल्याला पुढे कंधारला....'

त्याचे वाक्य मध्येच तोडत साहेबांनी त्यांना खुणेनेच गप्प बसवले. त्यांच्यातला रसिक उठायला तयार नव्हता. त्या धुंद वातावरणाचा भंग करणे त्यांच्या रसिक मनाला मानवेना . ते शेवटपर्यंत बसून राहिले. तन्मयतेने ऐकत राहिले.