• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-ते तुझे नोकर नाहीत !

ते तुझे नोकर नाहीत  !

यशवंतरावांनी कुटुंब आणि राजकारण यांच्यात उत्तम संतुलन साधले होते. आपल्या कुटुंबियांसाठी त्यांनी राजकारण राबवले नाही. ते दिल्लीत असताना त्यांचे अनेक नातेवाईक त्यांच्याकडे रहायला जात असत. पण यशवंतरावांनी त्यांना सरकारी कामकाजात कधीच हस्तक्षेप करू दिला नाही. आपल्याबरोबर काम करणा-या अधिका-यांचा, अगदी निजी सहाय्यकाचाही योग्य तो मान कुटुंबियांनी राखलाच पाहिजे असा त्यांचा दंडक होता. पायाला अपघात झाला म्हणून एकदा यशवंतरावांचा एक पुतण्या दिल्लीत दोन - तीन महिने त्यांच्या घरी राहण्यासाठी आला होता. एकदा ऑफिसमध्ये त्याच्यासाठी फोन आला. त्यावेळी ऑफिसमध्ये श्री. डोंगरे ( साहेबांचे स्वीय सहाय्यक ) यांच्यासोबत तीन - चार प्रतिष्ठित मंडळी बसली होती.

डोंगरे त्या पुतण्याला म्हणाले, ' बाळ , तू आतल्या खोलीत जाऊन बोल.' पण त्याने ते ऐकले नाही. उलट चार लोकांसमोर आपल्याला येथे बसून बोलण्यास विरोध केला म्हणून तो रागावला. त्याला आपला अपमान झाल्यासारखे वाटले व तो तेथूनच बोलण्याचा प्रयत्न करु लागला. शेवटी डोंगरेंनी त्याच्या हातून रिसिव्हर काढून घेतला. त्यामुळे पुतण्या आवाज चढवून बोलू लागला. साहेब आतल्या खोलीत होते. त्यांच्या कानावर ही वादावादी गेली. साहेबांनी पुतण्याला थोडे आत बोलावले आणि मागचा पुढचा विचार न करता खाडकन् त्याच्या थोबाडीत मारली आणि ते ओरडले, ' ते तुझे नोकर नाहीत ! ' मग डोंगरेंकडे वळून साहेब म्हणाले, ' उद्या सकाळचे याचे पहिल्या गाडीचे तिकिट काढून याला परत पाठवून द्या. '

हा गोंधळ ऐकून वेणुताई बाहेर आल्या. साहेबांच्या चेह-यावरील राग आणि त्यांचे थरथरणारे शरीर पाहून त्या खालीच बसल्या. कोणालाच काही सुचेना. कारण यशवंतरावांचा असा रुद्रावतार आत्तापर्यंत कोणीच पाहिला नव्हता, अनुभवला नव्हता. पण नखशिखान्त सुसंस्कृत असणा-या यशवंतरावांना अशिष्ट आणि उद्धट वर्तन सहन होणे शक्यच नव्हते.