• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-निवृत्त अधिकारी सेवेत !

निवृत्त अधिकारी सेवेत !        
   
देशाचे संरक्षणमंत्री म्हणून काम करीत असताना हुशार व कर्तव्यनिष्ठ अधिका-यांचा उपयोग करून घ्यायचा हे यशवंतरावांचे धोरण होते. पूर्वीचे संरक्षणमंत्री कृष्णमेनन हे पक्षपाती होते. त्यांच्या मर्जीतल्या अधिका-यांना ते झुकते माप द्यायचे. याउलट एखाद्या अधिका-यावर त्यांची वक्रदृष्टी पडली की त्याला ते अतोनात त्रास द्यायचे. भारतीय वायुदलाचे एअर व्हाईस मार्शल प्रतापचंद लाल हे मेनन यांच्या नाराजीचा बळी ठरले होते. खरं म्हणजे लाल यांनी दुस-या महायुद्धात चांगली कामगिरी केली होती. १९५७ ते १९६२ या  कालावधीत त्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळली होती. देशासाठीचे त्यांचे योगदान उल्लेखनीय होते, पण सप्टेंबर १९६२ मध्ये मेनन यांनी त्यांना वायुदलातून मुक्त करण्याचा आदेश काढला. प्रतापचंद लाल यांना इच्छेविरूद्ध निवृत्त व्हावे लागले. त्यानंतर लगेच चीनने भारतावर आक्रमण केले. कृष्णमेनन यांनी संरक्षणमंत्रीपद सोडावे अशी मागणी देशभरातून होऊ लागली. नेहरूंनी त्यांचा राजीनामा घेतला. यशवंतराव संरक्षणमंत्री झाले. प्रतापचंद लाल यांच्यावरील अन्यायाची माहिती त्यांना कळाली. अशा अनुभवी व पराक्रमी अधिका-याची देशाला नितांत गरज होती. यशवंतरावांनी त्यांना वायुदलाच्या सेवेत परत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. नेहरूंनी होकार दिला, पण तांत्रिकदृष्ट्या अडचण येऊ नये यासाठी अर्थमंत्र्यांची परवानगी आवश्यक होती. त्यावेळी मोरारजी देसाई अर्थमंत्री होते. यशवंतरावांचे व त्यांचे चांगले संबंध होते. ते त्यांच्याशी बोलले. मोरारजींनी यशवंतरावांचा शब्द मानला आणि निवृत्तीनंतर तीन महिन्यांनी प्रतापचंद परत सेवेत रूजू झाले.

पेन्शनच्या बाबतीत भविष्यात अडचण निर्माण होऊ नये म्हणून तीन महिन्यांची त्यांची बिनपगारी रजा मानली गेली. निवृत्त अधिका-याला परत सेवेत घेण्याचा भारतातील हा पहिलाच प्रसंग होता. एका प्रामाणिक अधिका-याला न्याय देण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी यशवंतरावांनी हा निर्णय घेतला.