• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- मागेल त्याला शिक्षण द्या !

मागेल त्याला शिक्षण द्या !

सन १९६२ साली यशवंतराव दिल्लीला गेले. त्यानंतरचे त्यांचे सगळे राजकीय जीवन यमुनेच्या काठीच गेले. पण महाराष्ट्राकडे त्यांचे बारीक लक्ष होते. अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत असत. एकदा केंद्रीय मंत्री असताना श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) येथील सी. डी. जैन कॉमर्स कॉलेजच्या उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. कार्यक्रमात आधीच्या वक्त्यांनी शाळेला सरकारी जमीन मिळण्यात नियमाची आडकाठी कशी निर्माण होते आणि शिकलेल्या मुलांची बेकारी कशी वाढतेय हे प्रश्न मांडले.

चव्हाण साहेब भाषणासाठी उठले. अत्यंत समयोचित असे भाषण त्यांनी केले. भाषणाच्या शेवटी अगोदरच्या वक्त्यांनी मांडलेल्या मुद्यांचा परामर्श घेताना ते म्हणाले, ' महाराष्ट्र सरकारला यशवंतराव चव्हाणांचा निरोप सांगा की, शैक्षणिक संस्थांना सरकारी जमीन देताना नियम आडवे येत असतील तर त्यात दुरूस्ती करा, पण जमिनी द्या. तुम्हाला जमीन मिळाली नाही तर मला पत्र द्या. ' सुशिक्षित बेरोजगारांविषयी ते म्हणाले, ' मुलं शिकली तर बेकार राहणार नाहीत आणि न शिकलेल्या बेकारांपेक्षा शिकलेले बेकार मला आवडतील. ते विचार करतील, आंदोलन करतील आणि शासनाकडून हवं ते मिळवतील, प्रसंगी शासनसुद्धा बदलतील. प्रत्येक मुलानं शिकलं पाहिजे. मागेल त्याला शिक्षण द्या. हेलपाटे मारायला लावू नका. आणि तुम्हाला सांगतो, शिक्षणासाठी इमारतीची गरज असतेच असे नाही. रविंद्रनाथांचे शांतीनिकेतन उघड्या आकाशाखाली , झाडांच्या सान्निध्यात आहे. इन्स्पेक्शन इमारतींचे नाही तर बुद्धीचे करा. सुंदर इमारतींमधून सुंदर ज्ञान घेऊन मुले बाहेर पडली तरच त्याला अर्थ आहे.'
महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे याची पूर्ण जाणीव यशवंतरावांना होती. शिक्षणावर खर्च केलेला पैसा ही चैन नसते, तर उज्वल भविष्यासाठीची ती तरतूद असते हे यशवंतरावांनी ओळखले होते.