• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-न्यायाधीशांचा सन्मान

न्यायाधीशांचा सन्मान   

यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. एकदा साता-यात त्यावेळचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गजेंद्रगडकर व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा एकत्र कार्यक्रम होता. साता-याचे जिल्हाधिकारी व जिल्हा  न्यायाधीश यांच्यात या दौ-याच्या निमित्ताने वाद सुरु झाला. सर्किट हाऊस ( विश्रामगृह ) मधील एक नंबरचा सूट ( कक्ष ) हा न्यायमूर्तींना दिला पाहिजे असा जिल्हा न्यायाधीशांचा आग्रह होता, तर एक नंबरचा सूट हा सदैव मुख्यमंत्र्यांसाठीच राखीव असतो, असे जिल्हाधिका-यांचे म्हणणे होते . न्या. गजेंद्रगडकर यांच्या अगोदरच यशवंतराव साता-यात आले. विश्रामगृहावर आल्याबरोबर त्यांनी जिल्हाधिकां-याकडे ' न्या. गजेंद्रगडकर कोठे उतरणार आहेत ' अशी चौकशी केली. जिल्हाधिकारी उत्साहाच्या भरात म्हणाले, ' एक नंबरचा सूट आपल्यासाठी राखून ठेवलाय. दोन नंबरच्या सूटमध्ये न्यायमूर्तींची व्यवस्था केली आहे.' हे ऐकल्यावर यशवंतराव म्हणाले, ' एक नंबरच्या सूटमध्ये न्यायमूर्तींची व्यवस्था करा ' आणि अधिक काही न बोलता ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी निघून गेले. या त्यांच्या अनपेक्षित वागण्याने सारेच चकित झाले.

न्यायाधीशपदाचा मान यशवंतरावांनी आपल्या कृतीतून नेहमीच राखला. शेवटी तेसुद्धा एक वकीलच होते  !