• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- जातीयवादाला थारा नको ... !

जातीयवादाला थारा नको ... !

सन १९४७ सालची गोष्ट पट्टाभि सितारामैय्या तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. पं. नेहरु अमेरिकेच्या दौ-यावर गेले असताना काँग्रेस कार्यकारिणीने एकमुखी निर्णय घेतला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा. त्यावेळी शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ वगैरे महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचा हा निर्णय जेव्हा बाबुराव काळेंना समजला तेव्हा ते अस्वस्थ झाले. व्यथित मनाने यशवंतरावांना ते म्हणाले, ' असे होणार असेल तर मी काँग्रेसचा त्याग केला पाहिजे. '

यशवंतराव विचारमग्न होते. ते म्हणाले, ' तशी वेळ येणार नाही, पण आलीच तर मी तुझ्याआधी काँग्रेसबाहेर पडेन. ' त्यांनाही कार्यकारिणीचा हा निर्णय मान्य नव्हता. संघाचे विसर्जन करून संघातील स्वयंसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास त्यांची हरकत नव्हती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून काँग्रेसमध्ये त्या संघटनेला स्थान देणे काँग्रेसच्या ध्येयधोरणांशी विसंगत आहे, अशी त्यांची धारण होती. पण श्रेष्ठींनी तर निर्णय घेतला होता. तरीही यशवंतरावांना नेहरुंच्या पाठिंब्याची आशा होती. त्यांनी प्रदेश काँग्रेसची बैठक घेऊन त्यात संघाला काँग्रेसच्या घटनेतील चुकीमुळे काँग्रेसप्रवेश दिला असेल, तर घटनेत दुरुस्ती करावी आणि संघाला प्रवेश देऊ नये, असा ठराव श्रेष्ठींना न जुमानता मंजूर करून घेतला व इतर प्रांतांच्या काँग्रेस कमिट्यांकडे पाठवला. त्यांनीही असेच ठराव केले. नेहरु अमेरिकेच्या दौ-यावरुन परत आल्यावर पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ' कोणत्याही जातीयवादी संघटनेला काँग्रेसमध्ये स्थान नाही. '

शेवटी गैरसमजातून ठराव झाल्याची सारसासारव पक्षाध्यक्ष सीतारामैय्या यांना करावी लागली. यशवंतरावांची धर्मनिरपेक्षता सच्ची होती. ते त्यांच्या राजकीय जीवनाचे पायाभूत तत्त्व होते.