• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-फक्त पदव्या मिळवू नका ; शहाणे व्हा !

फक्त पदव्या मिळवू नका ; शहाणे व्हा  !

द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर यशवंतरावांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय हा अशाच निर्णयापैकी एक होता. शेतक-यांची मुले शिकावीत हे यशवंतरावांचे आवडते स्वप्न होते. या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अनेकांचा विरोध पत्करून त्यांनी हा निर्णय घेतला. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न नऊशे रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार होता. साहजिकच या निर्णयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य संचारले. त्यांना हुरूप आला. परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न नऊशे रुपयांपेक्षा अधिक होते त्यांचे काय ? कायद्यानुसार त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नव्हता. तांत्रिकदृष्ट्या ते या सवलतीचा लाभ घेण्यास अपात्र ठरत असले तरी त्यांनाही मदतीची गरज होतीच. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी यशवंतराव कराडला आले असताना तेथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे काही विद्यार्थी त्यांना भेटले. ई. बी. सी. सवलतीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानून भीत भीत ते म्हणाले, ' साहेब, समजा आम्ही ई. बी. सी. सवलत मिळण्यासाठीचा फॉर्म भरला आणि नंतर आमच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न नऊशे रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले तर आमचे नुकसान तर होणार नाही ना ?' विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा रोख यशवंतरावांच्या लक्षात आला. त्यांच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, ' बाळांनो, तुमच्यावर खटले भरण्यासाठी आम्ही ही योजना काढलेली नाही. निर्धास्तपणे जा, फॉर्म भरा आणि शिक्षण घ्या. फक्त पदव्या मिळवू नका, तर शहाणे व्हा  ! '

साहेबांच्या या आश्वासक बोलण्याने विद्यार्थ्यांची चिंता मिटली. त्यांनी सवलतीसाठी अर्ज केला आणि अभ्यासाला सुरुवात केली. ग्रामीण महाराष्ट्राचा शैक्षणिक चेहरा बदलू लागला. सत्ता कोणासाठी राबवायची असते याचा ठाम निर्णय यशवंतरावांनी मनाशी घेतला होता आणि प्रसंगी नियमांना मुरड घालुनसुद्धा ते त्या निर्णयाशी प्रामाणिक राहिले.