• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

माझ्या राजकीय आठवणी २१

सन १९२८ च्या ठरावासंबंधी ब्रिटिश राजकर्त्यांनी स्तब्धता पाळल्यामुळें भारतीय काँग्रेसनें आपली प्रतिज्ञा पार पाडण्यासाठीं सन १९२९ च्या डिसेंबर ३१ च्या मध्यरात्री लाहोर येथें प. जवाहरलाल नेहरूंच्य़ा अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेसमध्यें संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला व काँग्रेसचा तिरंगी झेंडा अंतराळात चढविला. ब्रिटिश सरकारने देशाला सर्वप्रकारे दुर्बल करून सोडले आहे. तेव्हां ती दुर्बलता नाहींशी करण्याला स्वातंत्र्याशिवाय अन्य उपाय नाहीं. अशा आशयाच्या मजकुराचे एक पत्रक छापून सन १९३० च्या २६ जानेवारीला सर्व देशांत मिरवणूकी काढून सभा भरवून वाचले जावे असा आदेश काँग्रेसनें जाहिर केला. तो आदेश जनतेकडून मोठ्या उत्साहाने पाळला गेला. ता. २६ जानेवारीच्या स्वातंत्र्यदिनादिवशी देशनिष्ठेची शपथ घेणारी हस्तपत्रके लावावीत व त्याचे सभेत वाचन व्हावे असेहि ठरविण्यांत आले.

भारतीय काँग्रेसच्या वरील आदेशाप्रमाणें स्वातंत्र्यदिनानिमित्त गांवोगांवी काँग्रेसची प्रतिज्ञा पत्रके  सार्वजनिक ठिकाणीं लावून प्रचार करावा, प्रभातफे-या काढाव्या, सभा भरवून त्याचे वाचन करावे. या कार्यक्रमासाठीं आम्ही ह्या योजना आखल्या. टिळक हायस्कूलमध्यें इंग्रजी ६ वी मध्यें शिकत असलेल्या श्री. यशवंतरावांनी आपले वर्गमित्र व हायस्कूलमधील इतर विद्यार्थी यांना एकत्रित करून ता. २५-१-१९३ च्या मध्यरात्रीनंतर गांवांत पत्रके लावण्याचे काम सुरू केले. निरनिराळे गट आपआपल्या नेमलेल्या कामावर रुजू झाले. श्री. पांडुरंग डोईफोडे यांच्यासह स्वत: श्री. यशवंतराव हे कराडांतील चावडी चौकांत पत्रक लावीत असतां पोलिसांनी पाहिले. तेव्हां त्यांना पकडणेसाठीं पाठलाग सुरू झाला. श्री. पांडुरंग डोईफोडे पोलिसांना सापडले. पण श्री. यशवंतरावांनी पोलिसांना हुलकावणी देऊन पळ काढला. पोलिसांना मिळालेल्या बाहेरील माहितीप्रमाणें श्री. यशवंतरावांना पत्रके लावण्यातील साथीदार म्हणून अटक करण्यासाठी पोलिस अधिकारी टिळक हायस्कूलमध्यें गेले. पण तेथील राष्ट्रीयवृत्तीचे मुख्याध्यापक श्री. म. ह. दुवेदी यांनी हायस्कूल आवारांत मी कोणासहि तुमच्यां स्वाधीन करणार नाहीं असे स्वच्छ बजावून सांगितले मधल्या सुट्टीत शाळेच्या आवाराबाहेर पोलिसांनी श्री. यशवंतरावांना पकडले व त्यांचेवर खटला भरण्यांत आला. न्यायाधिशापुढें खटला सुरू होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाच्य़ा हितचिंतकांनी व सरकारी अधिका-यांनी पोलिसांनी श्री. यशवंतरावांनी गुन्हा कबूल करून माफी मागावी म्हणजे उगाच शिक्षणाचे नुकसान होणार नाही, असे सांगून त्यांचे मन वळविण्याचा उपदेश श्री. यशवंतरावांच्या आप्तेष्टांना केला. विशेष हे कीं, त्यांचे कुटुंबातील त्यांचे दोन्ही वडील बंधू श्री. ज्ञानोबा व श्री. गणपतराव किंवा त्यांच्या मातोश्री यांनी पोलिसांनी करावयास सांगितलेला उपदेश केला नाहीं व करणेची त्यांची तयारीहि नव्हती. कांही प्रतिष्ठानीं हा प्रयत्न करून पाहिला परंतु श्री. यशवंतरावांना आपल्या ध्येयनिष्ठेपासून कोणीही परावृत करू शकले नाहीं.

रीतसर खटला चालून श्री. यशवंतरावांना दिड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दिडशे रुपये दंड ठोठावण्यांत आला. त्यांच्या शैक्षणिक बाबीत अशारितीनें जो व्यत्यय आला, यांस त्यांची ध्येयनिष्ठा व आम्हा मित्रमंडळींचे प्रोत्साहन कारणीभूत झाले. पण याबद्दल मातोश्री व बंधू यांनी आम्हा कोणासच दोष दिला नाहीं, किंवा आमचेवर रोषही केला नाहीं. श्री. यशवंतरावांना झालेल्या शिक्षेबद्दल कांहींच दु:ख वाटले नाहीं. पण झालेला दंड पुणे येथील रानडे वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले १५० रुपयाचे बक्षीस पोलिसांनी जप्त करून वसूल केला. याबद्दल मात्र त्यांना फार दु:ख झाले.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              
सन १९३० च्या जानेवारी २६ रोजीं काँग्रेसच्या आदेशाप्रमाणें श्रीकृष्णाबाईच्या घाटावर दे. भ. आप्पासाहेब अळतेकरांच्या नेतृत्वाखाली दे. भ. पांडुआण्णा शिराळकर, दे. भ. रघुआण्णा धोपाटे, धर्मवीर गणपतराव बटाणे, श्री. गणपतराव आळतेकर, हरीभाऊ लाड व इतर १५-२० मंडळीनीं काँग्रेसच्या प्रतिज्ञा पत्रकाचे वाचन केले. सभेस सुमारे १००० श्रोते पांगून पांगून हजर होते. अर्थात कडक पोलिस बंदोबस्त होताच.