• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ४७

त्यांनी रत्नागिरीचे नाव काढताच मी प्रसन्न झालो.

त्यांनी विचारले,

''रत्नागिरीला जायला तू इतका उत्सुक का ?''

मी म्हणालो,

''त्याला दोन कारणे आहेत. मी अजून समुद्र पाहिलेला नाही. समुद्र कसा दिसतो, त्याच्या काठी उभे राहिले, म्हणजे कसे वाटते, हे मला माहीत नाही. कृष्णा-कोयनेच्या पावसाळी पुराच्या वेळी काठावर उभे राहून त्यांचा भर वेगाने वाहणारा, तुडुंब भरलेला, दोन्ही तटांना धरून चालणारा विशाल प्रवाह मी अनेक वर्षे पाहिला आहे. पण समुद्र ही गोष्ट अगदीच वेगळी आहे. पण ती काय आहे, याची कल्पना पुस्तकावरून आम्ही करतो. पण प्रत्यक्षात मी तो पाहिलेला नाही. रत्नागिरीला गेलो, की समुद्र पाहायला मिळेल ही माझी अपेक्षा आहे, आणि दुसरे कारण रत्नागिरीला सावरकर राहतात. जर आपण काही करून सावरकरांना भेटू शकलो, तर बरे होईल. त्यांना पाहण्याची माझी फार इच्छा आहे.''

राघूआण्णांना माझा समुद्राविषयीचा आग्रह पटला नाही, पण सावरकरांचा मुद्दा त्यांच्या मनाने ताबडतोब उचलून घेतला, आणि कराडला परत न जाता खाली कोकणात जाण्याचा आमचा निर्णय पक्का झाला.

तास, अर्ध्या तासात रत्नागिरीला जाणारी मोटर कोल्हापूरहून आली. तीमध्ये आम्ही बसलो आणि माझा कोकणचा पहिला प्रवास सुरू झाला. मलकापूर सोडून काही मैल पुढे गेल्यानंतर सह्याद्रीचा घाट लागतो. एवढ्या मोठ्या घाटातून मी यापूर्वी प्रवास केलेला नव्हता. मी पुण्यापर्यंत जाऊन आलो असल्यामुळे पुण्याच्या वाटेतील घाट मला माहीत होते. पण हा बराच लांब व अवघड घाट आहे. मोटार घाटातून जात असताना एकसारखे वळसे घ्यावे लागत असल्यामुळे माझे पोट काहीसे डचमळून व हादरून गेले होते. पण अगदीच ताब्याच्या बाहेर गेले नाही.
घाट संपल्यावर थोड्याच वेळात गाडी साखरप्याला थांबली.

आम्ही साखरप्याला उतरलो. माझ्या माहितीचे तेथे कोणीच नव्हते. राघू आण्णा तसा धीट आणि सगळ्यांशी मोकळा बोलणारा माणूस होता. त्यांनी लिमयांचे जे गाव होते (त्याचे नाव मी आता विसरलो आहे.), त्या गावाचा रस्ता कुणाला तरी विचारला आणि तो समजल्यानंतर त्या दिशेने आमची पुन्हा पायपीट सुरू झाली. लिमयांच्या मूळ गावी राघूआण्णाही प्रथमच आले होते. तसे लिमये मसूरमध्ये गेल्या तीन-चार पिढ्या राहिले होते. पण आपल्या पूर्वजांचे मूळ गाव पाहावे, ही माणसाची आंतरिक इच्छा असते. ती इतकी तीव्र असते, की त्या ओढीने माणूस बेचैन होतो. त्याच ओढीने राघूआण्णा तेथे आले होते. त्यांना मी विचारले,

''तुमचे घर-बीर येथे आहे का? ''

ते म्हणाले,