• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१७६

असाच एक दिवस गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार श्री. बाबासाहेब शिंदे आणि आमच्या शिराळा पेठ्यातील मुंबईत वकिली करत असलेले श्री. माधवराव देशपांडे हे माधवाश्रमात आमचा शोध करीत आले. श्री. के. डी. पाटील कुठे तरी बाहेर गेले होते. म्हणून मी एकटाच तेथे होतो. श्री. बाबासाहेबांनी मला आपल्या बरोबर चलण्याचा आग्रह केला. ते म्हणाले,    
''श्री. माधवराव देशपांडे हे तुम्हांला नेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या बरोबर आपण जाऊ या.''

कशासाठी? कुठे? असे मी त्यांना विचारले, पण त्यांनी उत्तर देण्याची टाळाटाळ केली. ते गाडी घेऊन आले असल्यामुळे त्यांच्या गाडीतूनच मी गेलो. मला वाटले, कुठे तरी जवळपास प्रवास असेल. गाडी बराच वेळ उत्तरेच्या दिशेने पुढे पुढे जात राहिली, तेव्हा मी जरा आग्रहाने त्या मंडळींना विचारले,

''आपण कुठे चाललो आहोत?''

श्री. माधवराव म्हणाले,

''आपण उपनगरात चाललो आहोत. श्री. बाळासाहेब खेरांनी तुम्हांला बोलावून आणायला सांगितले आहे. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे.''

ह्या वेळपर्यंत आम्ही श्री. बाळासाहेबांच्या बंगल्याच्या दाराशी पोहोचलो होतो. मी काहीसा आश्चर्यचकित झालो होतो व काहीसा गोंधळून गेलो होतो. माझ्या बरोबरच्या या दोन ज्येष्ठ मित्रांबरोबर मी त्या घरात प्रवेश केला आणि आम्ही बाळासाहेबांच्या बैठकीत जाऊन उभे राहिलो. तो साध्या पोशाखातील श्री. बाळासाहेब खेर नेहमीप्रमाणे हसून नमस्कार करीत पुढे आले आणि म्हणाले,
''या. चव्हाण, या. बसा.''

आम्ही बसलो. नंतर त्यांनी माझ्याकडे वळून सांगितले,

''मी तुम्हांला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही. पण पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मी तुमची निवड केली आहे.''

हे सर्व मला अगदीच अनपेक्षित होते, त्यामुळे आपण काय बोलावे, हे चटकन् माझ्या लक्षात आले नाही. म्हटले,
''ठीक आहे. मी घरी जाऊन येतो. मी काही तातडीने हजर होणार नाही.''

आज जेव्हा मी या घटनेचा विचार करतो, तेव्हा पार्लमेन्टरी सेक्रेटरीपद मला दिले, या संबंधाने मला काही फारसे बरे वाटले नव्हते, ही गोष्ट मला कबूल केली पाहिजे. माझे काम आणि माझी जाण यांच्या तुलनेने हे किरकोळ काम आहे, अशी माझी भावना झाली.

पण या बाबतीत तेथेच चर्चा न करता आम्ही तेथून निघालो. श्री. बाळासाहेबांचे मी आभार मानले. माझ्या दोन्ही मित्रांचेही आभार मानले. श्री. बाबासाहेब शिंदे यांना माझी मन:स्थिती समजली असावी. बाहेर आल्यानंतर ते मला म्हणाले,

''यशवंतराव, चूक कराल हं ! नाही म्हणू नका, तुमच्या सवडीने का होईना, पण येऊन हजर व्हा.''