• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ५०

एके दिवशी साहेब अचानक घरी अवतरले.  सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.  योगायोगानं साहेबांचे बंधू आणि आम्ही सर्व जण घरीच होतो.  त्यादिवशी साहेबांसह आम्ही एकत्र जेवण घेतलं.  प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी केली.  सर्वांना बोलले.  बाबुरावबद्दल विचारपूस केली.  बाबुरावनी आता सावध राहिलं पाहिजे म्हणाले.  विठाईला त्याची काळजी घेण्याबद्दल सांगितलं.  छोट्या पुतण्यांचा समाचार घेतला.  शेवटी माझ्याकडे आले.  माझी ख्यालीखुशाली विचारली.  माझ्यामुळं तुम्हा सर्वांना त्रास होतोय याची मला कल्पना आहे म्हणाले.  बाहेर अंधारून आलं होतं.  साहेबांनी सर्वांचा निरोप घेतला.  क्षणात नजरेआड झाले.  आमच्या घरावर पोलिसांची पाळत असावी.  त्यांना साहेब येऊन गेल्याची खबर मिळाली असावी.  साहेबांना जाऊन तीन-चार दिवस झाले असतील तोच पोलिसांनी सकाळी सकाळी आमच्या घराला घेरलं.  साहेबांचे मधले बंधू गणपतराव यांना अटक केली.  आईने प्रतिकार केला; पण पोलिस ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.  आम्ही आईला आवरलं.  गणपतरावांना विसापूरच्या जेलमध्ये पाठविण्यात आलं.  

बर्‍याच दिवसांनी बाबुराव कोतवालाचे आज घराला पाय लागले.  नेहमीचा उत्साह त्यांच्यात जाणवला नाही.  चेहरा पडलेला होता.  मीच पुढे होऊन चौकशी केली,

''कुठे होता इतके दिवस ?  घरची काही काळजी आहे की नाही ?''

बाबुराव सांगू लागले, ''मामा घरी येऊन गेल्यानंतर तीन-चार दिवसांत मधल्या मामांना अटक झाल्याची वार्ता मामांना कळली.  मामांनी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची गुप्‍त बैठक घेतली.  या बैठकीत असा निर्णय झाला की, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना केव्हाही अटक होऊ शकते.  त्याकरिता सर्वांनी जिल्हा सोडून पुणे, मुंबईकडे जावे.  मामांनी तर लगेच जिल्हा सोडावा असं ठरलं.  मामांना सुखरूप रेल्वेत बसून देण्याची तयारी आत्माराम बापू पाटील यांनी केली.  रात्रीच्या अंधारात रेल्वेस्टेशनजवळील पिकात आत्माराम बापू व मामा जाऊन बसले.  एकाला दुसर्‍या वर्गाचे तिकीट काढावयास पाठविले.  रेल्वे वेळेवर स्टेशनवर आली.  मामा आणि आत्माराम बापू गाडी रेल्वेस्टेशनमध्ये येताच पिकातून निघाले.  त्या गोंगाटात प्लॅटफॉमवर पोहोचले.  मामांनी जोधपुरी कोट व फरची टोपी घातली होती.  आत्माराम बापू तिकीट खिडकीकडे गेले.  गाडी थांबताच मामा दुसर्‍या वर्गाच्या डब्यात जाऊन बसले.  डबा खालीच होता.  ते आत्माराम बापूंची वाट पाहू लागले.  आत्माराम बापू घाईगडबडीत डब्याजवळ पोहोचले.  तिकीट मिळाले नाही म्हणून साहेबांना सांगू लागले.''

मामा आत्माराम बापूला म्हणाले, ''काय व्हायचं ते होईल.  तुम्ही आता जा.''

रेल्वे निघाली.  मी मध्येच बाबुराव कोतवालांना बोलायचं थांबून विचारलं, ''साहेब सुखरूप पोहोचले की नाही ?''

बाबुराव कोतवाल सांगू लागले, ''आत्माराम बापूंनी मला सांगितलेली हकीकत मी तुम्हाला सांगतो.  रेल्वेस्टेशनमधून गाडी निघून वेग घेते ना घेते तोच ज्या डब्यात मामा होते त्या डब्यात एक पोलिस चढला.  त्याला पाहून मामांना आपल्या भूमिगत चळवळीचा शेवट आज होणार असं क्षणभर वाटलं.  गाडीनं वेग घेतला.  तो पोलिस आत आला आणि मामाची चौकशी करू लागला.  

तो म्हणाला, ''तुम्ही कुठे निघालात ?'' मामा म्हणाले, ''पुण्याला.''

तो अधिकची चौकशी करू लागला.  तिकिटाची हकीकत मामांनी त्याला सांगितली.  पुढच्या स्टेशनवर उतरून गार्डला सांगून तिकीट घेणार.  मामांना त्याचा अंदाज आला होता.  तो काही मामांना पकडायला आला नव्हता.  हलक्या आवाजात मामांना तो म्हणाला,

''कशाला काढता तिकीट ?  मी तुम्हाला सुरक्षित पोहोचवितो पुण्याला.  तिकिटाचे पैसे मला द्या.''