• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ३

प्रेरणा

भारतीय राजकारणातील जाणते सत्तार्षी थोरले साहेब (यशवंतराव चव्हाण) हे महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचे धुरंधर मुत्सद्दी.  ३८ वर्षे सत्तेत राहून आपल्या दूरदृष्टीच्या कर्तृत्वानं कृषी संस्कृतीला त्यांनी मानाचं स्थान प्राप्‍त करून दिलं.  ॠषी संस्कृतीच्या नेतृत्वाला लाजवील अशा राजकीय मुत्सद्दीपणाचा अवलंब करून जगभर भारतीय राजकारणातील एक धुरंधर नेता म्हणून प्रतिमा निर्माण केली.

आज या लोकशाहीप्रणीत भारत देशात वंचितांची आणि शेतकर्‍यांची मुलं मोठ्या कुशलतेनं आणि आत्मविश्वासानं सत्तेत, प्रशासकीय सेवेत आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चौफेर यशस्वीपणे वावरत आहेत.  साहेबांच्या ध्येयधोरणाला आलेली ही फळं आहेत.

औरंगाबाद येथे स्नेह विकास मंडळाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत आमच्या मित्रसाधना मंडळाने ९० पौंडी वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला.  मित्रसाधना मंडळाच्या संघाचा मी कर्णधार होतो.  या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम साहेबांच्या हस्ते १४ नोव्हेंबर १९६० ला पार पडला.  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना मला जो साहेबांचा स्पर्श झाला त्या दिवसापासून माझ्या आयुष्याची यशस्वी वाटचाल सुरू झाली.  साहेबांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळेच आम्ही घडलो.  आयुष्यातील यशाचे शिखर गाठू शकलो.

'संकटाचा सूर्य माथ्यावर आला म्हणजे स्वतःची सावली साथ सोडते' असं म्हणतात.  वेणुताईंची वेगळी अशी सावली राहिलीच नाही.  साहेबांची सावली हीच वेणुताईंची सावली ४१ वर्षांच्या वाटचालीत ठरली.  संकटकाळी आणि नैराश्याच्या प्रसंगी साहेबांची साथसंगत केली.

'सोनहिरा' या ओढ्याच्या परिसरात साहेबांचं संस्कारक्षम बालपण घडलं.  संस्कारक्षम वयात जे संस्कार मनावर बिंबतात ते भावी यशस्वी जीवनाचे चिरे ठरतात.  'सोनहिरा' या ओढ्याच्या पाण्यात पोहताना साहेबांनी जे साहस केलं त्या प्रसंगातून त्यांच्या मित्रांनी साहेबांचे प्राण वाचविले.  मित्रत्वाची संगत नवीन जीवन देऊ शकते या संस्काराची जाणीव साहेबांनी जीवनभर ठेवली.

सत्तेच्या वर्तुळात वावरत असताना वंचितांच्या आणि शेतकर्‍यांच्या सुखदुःखाशी साहेब समरस झाले.  यशस्वी जीवनाची वाटचाल करीत असताना त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं त्या अडचणी वंचितांच्या आणि शेतकर्‍यांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांनी त्याकरिता जे निर्णय घेतले ते 'सह्याद्री' या निवासस्थानावर.  घेतलेल्या या निर्णयामुळं महाराष्ट्र देशात नंबर एकचं राज्य ठरलं.  त्यांचं कर्तुत्व उजळून निघालं.  

साहेब भारताचे संरक्षणकर्ते झाले.  आपल्या कर्तृत्वाची पताका दिल्लीवर फडकविली.  जागतिक पातळीवर त्यांचं नेतृत्व तळपू लागलं.  भारताच्या जीवनात पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताला पहिला विजय मिळवून दिला.  भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील इचोगिल कालव्यापर्यंत मजल मारली.  पाकिस्तानी सैन्यानं लाहोरच्या संरक्षणाकरिता इचोगिल कालव्यावरील पूल उडवून दिला.  हा पूल उडविला नसता तर भारतीय सैन्याने लाहोर काबीज केलं असतं.  लाहोरला लागूनच 'अटक' शहर आहे.  इतिहासाची पुनरावृत्ती झाली म्हणून 'अटकेपार' या भारतीय प्रेरणेचा वापर मी केलेला आहे.

मी साहित्याचा वाचक आहे, साहित्यिक नाही.  वंचित वर्गाच्या आणि शेतकर्‍यांच्या जीवनासंबंधी जे काही साहित्य लिहिलं गेलं त्याचा मी विद्यार्थी असल्यापासूचनचा वाचक आहे.  मॅक्झिम गोर्की यांच्या 'आई' कादंबरीपासून ते महात्मा फुलेंच्या 'शेतकर्‍याचा असूड' पर्यंत मी वाचत आलो आहे.  'शेतकर्‍याचा असूड' व देशमुखांच्या 'बारोमास' या कादंबरीतील प्रश्नांशी माझे जीवन निगडित आहे.