• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १८४

मंत्रिमंडळाच्या बैठकीला, आणीबाणीविषयक उपसमितीच्या बैठकीला साहेबांनी हजेरी लावली.  २८ मार्चला दुपारी राष्ट्रपतींची भेट घेतली.  आपली होत असलेली घुसमट व राजीनाम्यासंबंधी चर्चा केली असावी.  मी आणि साहेबांनी राजीनाम्याबद्दल सविस्तर चर्चा केली.  स्वाभिमान गहाण टाकून काम करण्यात काही स्वारस्य नाही, असा निष्कर्ष आम्ही काढला.  शेवटी सर्व व्यथा नेहरूजींच्या कानावर टाकाव्यात व त्यानंतर राजीनाम्याचा मनोदय व्यक्त करावा, असं आम्हा दोघांचं ठरलं.

अनेक मित्र व सहानुभूतीदार साहेबांना भेटत.  साहेब त्यांच्याजवळ आपल्या व्यथा व्यक्त करत.  अशोक मेहता साहेबांना भेटून गेले.  त्यांनी पटनाईक यांनी रशियन वकिलासोबत चर्चा केल्याची माहिती साहेबांना दिली.  पत्र लिहू नये असा सल्ला दिला.  घट्ट पाय रोवून वातावरण तापतं ठेवावं.  त्यांनी इतिहासातील एक प्रसंग सांगितला - दुसर्‍या जॉर्जचा.

'जॉर्ज, राजासारखं वाग' असं जॉर्जच्या आईनं जॉर्जला सांगितलं.  पण साहेबांची ती मानसिकता नव्हती.  साहेब येथे आले ते नेहरूजींच्या मदतीकरिता.  त्यांना अडचणीत टाकण्यासाठी नाही...

त्यांनी एक पत्र लिहिले.  त्या पत्रात लिहिले होते, ''पटनाईक यांच्या भूमिकेमुळे संरक्षण खात्यात दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाली.  लष्करी अधिकारी व सैनिकांत संरक्षणमंत्र्याचा जो दबदबा पाहिजे त्या प्रतिमेला तडा जातो.  देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक व गंभीर प्रसंग उभा राहू शकतो.  संसदेला मी बांधील आहे.  तिला खोटीनाटी माहिती पुरविणं माझ्या मनाला पटत नाही.  दैनंदिन व्यवहारात तिन्ही सेनापती अडचणीत येत आहेत.  अंतिम निर्णय कुणाकडून घ्यावा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.  या सर्व प्रक्रियेतून देशासमोर कठीण प्रसंग उभे राहतील.  संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी एकाहाती असल्यास निर्णयप्रक्रिया प्रभावी राहील.  धोरणात्मक निर्णयाला बळ प्राप्‍त होईल.  सैनिकांत एकसंध भावना निर्माण होईल.  संसदेत संरक्षणमंत्री हाच सर्व निर्णयप्रक्रियेस जबाबदार धरला जाईल.  आपणास जो काय निर्णय घ्यायचा तो कुणाचाही मुलाहिजा न ठेवता घ्यावा.  व्यक्तिगत माझाही विचार करण्याचे कारण नाही.  या गोंधळात देशाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे.''  या पत्रात शेवटी साहेबांनी आपण राजीनामा देत असल्याचा उल्लेखही केला.

हे पत्र नेहरूजींचे खाजगी चिटणीस खन्ना यांच्या हवाली करण्यात आले.

'तीनमूर्ती भवन' मधून खन्ना यांचा साहेबांना निरोप आला.  १ एप्रिल ६३ ला ७.३० वाजता नेहरूजींची भेट ठरली आहे.  ठीक साडेसात वाजता साहेब 'तीनमूर्ती' येथे पोहोचले.  नेहरूजी व साहेबांची बैठक जवळजवळ एक तास चालली.  साहेबांनी लिहिलेल्या पत्राबद्दल नेहरूजींनी नाराजी व्यक्त केली.

म्हणाले, ''तुमच्या माझ्याबद्दल काय भावना झाल्या आहेत मला माहीत नाही.  तुम्ही या पद्धतीनं पत्र का लिहिलंत ?  तुमच्यावर माझा विश्वास नसता तर अशा कठीण प्रसंगी मी तुम्हाला बोलावून संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली असती का ?''