• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १६८

''मी काय सल्ला देणार तुम्हाला !  तुम्ही निर्णय घ्यायचा आणि मी तुम्हाला साथ द्यायची हे आपलं ठरलेलं आहे.  तरीपण मला वाटतं महाराष्ट्रात वंचितांकरिता अजून बरंच काही करायचं बाकी आहे.  आपण आताच कुठे आईला इथे घेऊन आलो.  त्यांना दिल्लीचं हवामान सोसंल का ?  त्यांचं आता वय झालं आहे.  या सर्व बाबींचा विचार करून आपण निर्णय घेऊया.'' मी.  

''तुझं म्हणणं पटतंय मला.  महाराष्ट्रातील जनतेकरिता खूपकाही करण्याची माझी इच्छा आहे.  आधुनिक महाराष्ट्र निर्माण करून वंचितांचं जीवन सुजलाम् सुफलाम् करायचं मला.  त्याकरिता मला महाराष्ट्रात थांबावयास पाहिजे.  पण मी नेहरूजींना दिलेला शब आणि वंचितांच्या उन्नतीची घेतलेली शपथ या दोन्हीपैकी मला एकाची निवड करावी लागणार.  कुणाची निवड करावी या द्विधा मनःस्थितीत अडकलोय मी.''  साहेब.

''यापैकी तुम्हाला एकाची निवड करावीच लागणार.  आई आपल्यासोबत राहतील असा मला विश्वास आहे.  त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठशी आहे.'' मी.

''आशीर्वादावरून मला आठवण झाली.  जेव्हा मी द्वैभाषिक राज्याची सूत्रं स्वीकारली तेव्हा मी नेहरूजींना आशीर्वाद मागितला.  'तुमचा आशीर्वाद मला असू द्या' असे मी म्हणालो होतो.  त्यावर 'माझा आशीर्वाद सहज कुणाला मिळत नाही' असे नेहरूजी म्हणाले होते.  यावेळेस त्यांचा आशीर्वाद मला मिळेल का ?  तसेच दिल्ली ही अनाकलनीय आहे.  गूढ वातावरण, आपल्या मोहपाशात कुणाला केव्हा गुंडाळेल याचा थांगपत्ताही नाही.  दिल्लीकरांच्या मनाचा ठाव लागणं कठीण.  अत्यंत आतल्या गाठीतले.  बुद्धीच्या चाली अत्यंत किचकट.  या चालीला शह देण्याचा विचार करेपर्यंत दुसरीच तिरकस चाल चालून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलेलं असतं.  येथील राजकीय जीवनाला अत्यंत वेग आहे.  या वेगाशी, गतीशी आपण स्वतःला गतिमान ठेवू शकलो नाही तर राजकारणाच्या धावपट्टीबाहेर आपण फेकले जातो.  फंदफितुरीचं बाळकडू प्यायलेलं वातावरण, अविश्वास, येथील स्थायिभाव या सर्व वातावरणात आपल्यासारख्या सरळमार्गी माणसाचा दम घुटतो.  निष्ठुर मनानं निर्णय घेऊन आपल्याला केव्हा हुलकावणी देतील याचा नेम नाही.  इतिहासात मराठी माणसाचं पानिपत करणारी ही दिल्ली.  इथे आपला निभाव लागेल का ?  या सर्व अडथळ्यांना दूर सारण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे का ?  याचा विचारही आपल्याला करावा लागेल.'' साहेब.

''आपण ही गोष्ट आईच्या कानावर घालावी असं मला वाटतं.  त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेऊ.'' मी.

मी आणि साहेब आईकडे गेलो.  आई सकाळी स्नानसंध्या उरकून आपल्या विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या.  हातात तुळशीची जपमाळ.  सकाळीच आम्ही त्यांच्याकडे आलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं असावं.  मी व साहेबांनी आईचं दर्शन घेतलं.  आईच्या पायाशी बसलो.  

''कसंकाय येणं केलं दोघांनी ?  आनंदात तर आहात ना ?'' आई.  

''आपला आशीर्वाद घ्यायला आलो आहे आम्ही.'' साहेब.