• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १६६

अटकेपार

आज सकाळी मला ५ वाजता जाग आली.  साहेब उठले की काय म्हणून मी त्यांच्या खोलीत डोकावून बघितलं.  साहेब खोलीत नव्हते.  मी वाचनालयात जाऊन बघितलं.  तिथेही साहेब मला दिसले नाहीत.  मी हॉलमध्ये आले तर हॉलचा मुख्य दरवाजा मला उघडा दिसला.  मी बंगल्याबाहेर आले तर साहेब बाहेरील हिरवळीवर फिरताना मला दिसले.  मी त्यांच्या जवळ गेले.  त्यांच्यासोबत चालू लागले.  काल सह्याद्रीवर आल्यापासून मी पाहते, साहेब थोडे विचारमग्न दिसताहेत.  त्यांच्या मनात काहीतरी शिजतंय.  त्यांच्यासोबत चालता चालता मी साहेबांना विचारलं.  

म्हणाले, ''आज इतक्या लवकर उठून वाचनालयात जाऊन वाचत बसण्याऐवजी तुम्ही बाहेर फिरताहेत हे पाहून मला आश्चर्य वाटलं.  बरं वाटत नाही का तुम्हाला ?  मी कालपासून बघते तुम्ही अबोल झालात ते.  मला नं सांगण्यासारखं काही घडलं का ?''

''कालपासून मी तोच विचार करतोय की तुला कस सांगावं.'' साहेब.

''त्यात काय एवढं विचार करण्यासारखं.  आतापर्यंत जसं अधिकारवाणीनं सांगत आलात तसंच आताही सांगायचं.'' मी.

''खरं आहे तुझं म्हणणं.  मी अधिकारवाणीनं तुला सांगत आलो आणि तू माझ्या 'हो' मध्ये 'हो' मिळवत गेली; पण आताच्या निर्णयात तू मला साथ देशील किंवा नाही याबद्दल मला विश्वास वाटत नाही.  कारण माझा हा निर्णय आपल्या भावी आयुष्याच्या वाटचालीत अत्यंत जिकिरीचा ठरणार आहे.'' साहेब.

''हा विचार तरी तुमच्या मनाला कसा शिवला की, मी तुम्हाला साथ देणार नाही म्हणून ?  आता दुसरा विचार नाही.  जे काही करायचं, जगायचं ते केवळ एकमेकांच्या संगतीत.  जी काही वाटचाल करायची ती साथ साथ.'' मी.

मी असं म्हटल्यानंतर साहेबांनी माझ्या नजरेस नजर मिळविली.  माझ्या नजरेत त्यांना विश्वास दिसला असावा.

ते म्हणाले, ''काल दिल्लीहून नेहरूजींचा दूरध्वनी आला होता. म्हणत होते, तुम्हाला माझ्या मदतीकरिता दिल्लीला यावं लागेल.'' साहेब.

''तुम्ही काय सांगितलं नेहरूजींना ?''  मी.