• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १५४

या पवित्र आणि मंगलदिनी साहेबांनी शिवनेरीवर बसविण्याकरिता राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाळराजे शिवबांचा आसनस्थ पुतळा तयार करून घेतला.  साहेबांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण आज होणार आहे.  ठरलेल्या वेळेला साहेब आणि मी शिवनेरीवर पोहोचले. चौघडा व सनईच्या मंगलमय सुरांनी गडावरील वातावरण भारावून गेलं होतं.  साहेबांनी विधिवत पुतळ्याचं अनावरण केलं.  या वेळी शिवप्रेमी आणि मावळ्यांनी एकच जल्लोष केला.  साहेबांनी नवनिर्मित महाराष्ट्राच्या भविष्यातील वाटचालीचं सूतोवाच याचप्रसंगी केलं.  

म्हणाले, ''महाराष्ट्रातील तमाम तीन कोटी जनतेच्या भावना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या भाग्यविधात्याला दंडवत घालण्यासाठी आज या मंगल आणि पवित्र दिनी मी इथे आलो आहे.  तुमच्यासोबत मीही या भाग्यविधात्याचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहे.  युगकर्त्या छत्रपतींच्या जन्मस्थळी स्वतंत्र भारताचे निशाण मोठ्या दिमाखाने फडकत व डौलत आहे.  नवमहाराष्ट्राच्या निर्मितीदिनी स्वतंत्र भारताने छत्रपतींना मानाचा मुजरा केला आहे.  शिवनेरीने स्वराज्य निर्मितीचा इतिहास घडविला नव्हे, तर इतिहास निर्मात्यास जन्म दिला.  छत्रपतींच्या जन्माने महाराष्ट्राच्या इतिहासाचा जन्म झाला.  छत्रपतींनी भारताच्या इतिहासात स्वराज्य स्थापन करून एक नवीन परंपरा निर्माण केली.  विसाव्या शतकात स्वतंत्र महाराष्ट्राचा जन्मही या सुवर्णदिनी होत आहे हा एक योगायोग आहे.

स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींच्या काळात मराठ्यांनी हातात तलवारी घेऊन चालवल्या.  लोकशाहीत नवमहाराष्ट्र मिळविताना बुद्धीचे कसब दाखवून कर्तृत्व गाजवावं लागलं.  महाराष्ट्रीयन मन महाराजांना परमेश्वर मानणारं आहे.  महाराजांना परमेश्वर मानणारा महाराष्ट्रीयन असे मानतो की, आमच्यात जी शौर्याची, कर्तृत्वाची चांगली व उदात्त भावना आहे ती देशासाठीच आहे.  प्रथम आम्ही भारतीय आहोत व नंतर महाराष्ट्रीयन.

महाराष्ट्रातील मराठी माणसानं नवमहाराष्ट्राच्या निर्मितीकरिता जो लढा दिला तो लढा अविस्मरणीय आहे.  मी वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  त्या चूक की बरोबर होत्या या वादात मी जाणार नाही; पण त्या भावना प्रामाणिक होत्या.  महाराष्ट्राशी इमान राखणार्‍या होत्या.  या लढ्याचे दोन कालखंड मी मानतो.  एक प्रतापगडावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण समारंभापूर्वीचा कालखंड आणि दुसरा प्रतापगडावरील समारंभ ते शिवनेरीपर्यंतचा.  छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्‍घाटनाकरिता स्वतंत्र भारताचे पंतप्रधान प्रतापगडावर आले.  त्यांनी महाराष्ट्रीयन जनतेच्या रुद्रावताराचे रूप बघितले आणि महाराष्ट्रनिर्मितीच्या आड ज्या निगरगाठी होत्या त्या सैल होण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्राची चार प्रेरणास्थानं आहेत असे मी मानतो.  ज्ञानदेव-तुकाराम यांची संत प्रेरणा, छत्रपती शिवजी महाराजांची पराक्रमी कर्तृत्वाची प्रेरणा, महात्मा फुले यांच्या रूपानं स्वार्थत्यागाची प्रेरणा आणि लोकमान्यांच्या विद्वत्तेची प्रेरणा.  या चा प्रेरणांनी महाराष्ट्राच्या जीवनाची जडणघडण केलेली आहे.