• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ९८

५२ Montego Bay (Jamaica)
४ मे, १९७५
Happy days
(Tryall in Hanover)

परवा संध्याकाळपासून या ठिकाणी आहे. आज दुपारी Weekend संपवून आम्ही सर्वजण परत किंग्जटनला जाऊ.

बऱ्याच वर्षांनंतर अशी सुट्टी मिळाली. जमेकाचे बाहेरील धनिक लोकांनी आपल्या विश्रामासाठी बांधलेली ही सुंदर वसाहत आहे. समुद्रकाठाला लागून असलेल्या छोटेखानी टेकडयांवरील हिरव्यागर्द वृक्षराजीमध्ये इतस्तत: पसरलेले तीस एक बंगले असावेत. एकापेक्षा एक उत्तम. सुरेख रंगीबेरंगी फुलांनी नटलेला झाडोरा आवती-भोवती. एकमेकांपासून अलग-पण म्हटला तर शेजार आहे.

खाण्या-पिण्याची उत्तम व्यवस्था. (आम्ही पिणारे नाही हे पाहून आमची व्यवस्था ठेवण्यासाठी येथे हजर असलेल्या लोकांची फारच निराशा झाली.)

मी काल येथील Swimming pool मध्ये फार वर्षांनी पोहून घेतले. येथून १२ मैलांवर असलेल्या माँटेगो बे या शहरात फेरफटका मारून आलो आणि दुपार झक्क झोपून काढली.

काल रात्री येथील बीचवर प्रधानमंत्रि श्री. मॅनली यांची पार्टी होती. त्याला हजर राहिलो. सर्व Heads of Govt. हजर होते.

जमेकाच्या संगीताची पार्श्वभूमी आणि सागराच्या लाटांच्या तालबध्द चढउताराची लय यांची साथ, यामुळे पार्टी लगेच जमून गेली. गप्पांचा कलकलाट. अधूनमधून हास्यांची उडणारी कांरजी. हातांत हात घालून मोकळेणाने इकडे तिकडे भटकणारी जोडपी-सगळे वातावरण कसे मोकळे मोकळे होते.

कॅनडाचे प्रधानमंत्रि श्री. ट्रयूडो आणि श्रीमती ट्रयूडो हे जोडपे विशेष खूष दिसले. संगीत अधिक तेज होताच या जोडप्याने नृत्याचा श्रीगणेशा केला. बहुतेक सर्व जोडपी त्यांत सहभागी झाली. अशा तऱ्हेने हा आनंद-समारोह रात्री ११ वाजेपर्यंत चालू होता.

या पार्टीमध्ये या ठिकाणी दोन-चार सिंधी धनिक जोडपी भेटली. जगात कोठेही जा, सिंधी तेथे असतात. आणि नुसते असतात असे नाही तर ते महत्त्वाचे व्यापारी असतात. इंपोर्ट-एक्स्पोर्टचा त्यांनी कबजा केलेला असतो. सर्वांचा पुणे-मुंबईशी संबंध असल्यामुळे केव्हा ना केव्हातरी ते आपणाला भेटलेले असतात.

त्या सर्वांनी तू बरोबर आहेस का म्हणून चौकशी केली आणि माझ्या एकाकीपणावर नेमके बोट ठेवले.

गेली चार-पाच वर्षे मी जगभर भटकतो आहे पण एकटा. मला याचा आता कंटाळा आला आहे. आजच इजिप्तच्या विदेशमंत्र्यांची दिल्लीला आलेली तार मला येथे Re-direct होऊन मिळाली त्यांनी २६ मे ते ३० मे या माझ्या दौऱ्याच्या वेळी मिसेस् चव्हाणना घेऊन या असे आग्रहाने लिहिले आहे. तुझी अडचण मला माहीत का नाही? काय वाटते ते मनात आले म्हणून लिहीत आहे.