• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ८२

४२ ओटावा 
२६ सप्टेंबर, १९७४

लंडन ते माँट्रियलचा प्रवास सात तासांत झाला. एअर-कॅनडा चांगली सर्व्हिस वाटली. सेवा उत्तम. खाद्यपदार्थ उत्तम, स्वच्छ. प्रवास सुरेख झाला.

माँट्रियल हे महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. ओटावापासून १२० मैलांवर आहे. (टोरॅन्टो हे दुसरे शहर जवळच आहे. या दोन शहरांची एका अर्थाने परस्परांत स्पर्धा आहे.)

दुपारच्या ४॥ वाजता (कॅनेडियन वेळ) ओटावाला पोहोचलो. ओटावा हे इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही. हे राजधानीचे शहर तुलनेने छोटे शहर आहे. ३-४ लाखांची वस्ती असावी. ओटावा नदीच्या काठी हे शहर म्हणून ओटावा.

ओटावा नदीचे पार क्विबेक प्रांत आहे. गावातून एक शानदार कालवा जातो. या कालव्याच्या काठाने एक सुरेख रस्ता जातो. शानदार बंगले, त्यांच्या सभोवार भरपूर मोकळी जमीन. हिरव्यागार गवतांची छोटी छोटी अंगणे, मोठी आकर्षक वाटली. नदीच्या काठी असलेल्या युनिव्हर्सिटीच्या नव्या इमारती, गावात जाता जाता न्याहाळल्या.

दुसऱ्या दिवशी शहराबाहेर, नदीपलीकडे असलेल्या विस्तीर्ण पार्कमध्ये जाऊन आलो. खरे म्हणजे कॅनडा देश एक विस्तीर्ण पार्कच आहे. उत्तर कॅनडा म्हणजे एक विशाल वनच आहे. येथील लाकडाचा धंदा हा फार महत्त्वाचा परंपरागत धंदा आहे. परंपरेने धनपती असलेले लोक टिंबरचे व्यापारीच होते व आहेत.

मी ज्या पार्कमध्ये गेलो होतो, त्यात जवळ-जवळ ६०० एकरांची एक इस्टेट माजी प्रधानमंत्री श्री. मॅकेन्झी किंग यांनी देशाला अर्पण केली आहे. आम्ही यात पायाने हिंडलो, भटकलो. आराम वाटला.

काल परिषद सुरू झाली. या परिषदेमध्ये फारसा प्राण राहिलेला नाही. एक औपचारिक मेळावा, हेच खरे रूप होत चालले आहे.

इंग्लंडचे वित्तमंत्रि निवडणुकांमुळे आलेले नाहीत. जॉन टर्नर चेअरमन निवडले गेले. त्यांना मी कालच भेटून आलो होतो. टर्नरची मुख्य काळजी, खेळीमेळीने परिषद कशी पार पडेल हीच होती. न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधून कुणीही प्रमुख येत नाहीत याची त्यालाही खंत आहे.

कॅनडाचे प्रधानमंत्रि परिषदेच्या उद्घाटनास आले होते. १०-१२ मिनिटांचे भाषण केले. सामान्य वाटले. परंतु त्याने उच्चारलेले एक वाक्य माझ्या मनातून जात नाही.

"and we realised then as well that answers which do not confer comforts upon ordinary human being are not answers at all"