• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ७८

४० प्राग
३ जुलै, १९७४
(रात्री १० वाजता)

शेवटचा कार्यक्रम पार पाडून आत्ताच परत आलो. उद्या सकाळी ७.५० ला येथून निघणार. पॅरिस-मुंबई मार्गे परत दिल्लीस.

येथील अर्थमंत्रि श्री. लिओपाल्ड लेर- (व त्यांची पत्नीही) अतिशय आतिथ्यशील जोडपे - गृहस्थ आहेत. मी येथे आल्यापासून गेले चार दिवस एकसारखे माझेबरोबर आहेत. लहान-सहान गोष्टींकडे लक्ष ठेवतात व व्यवस्था करतात. हिंदुस्थानबद्दल या सर्वांच्या मनात विलक्षण आदर आहे.

त्यांच्या प्राईम् मिनिस्टरला काल भेटलो. ४८-४९ वर्षांचा तरुण आहे. हार्ड कम्युनिस्ट! परंतु बोलण्या-चालण्यात मोकळा. एकंदरीत सोव्हिएट रशियापेक्षा वातावरण मोकळे वाटले.

एक गोष्ट मात्र माझ्या मनाला खटकली. ती म्हणजे अनेक ठिकाणी झेक निशाणाबरोबरच रशियन निशाण असे. याचा काय नेमका अर्थ तो समजला नाही. आम्हीही कोणाला विचारले नाही.

ब्राटिसाएव्हच्या भेटीत 'झोक-शॅले' मध्ये ऐकलेल्या रशियन गाण्याची आठवण झाली. व्होल्गा नदीला उद्देशून गाणे होते. नदीचे गाणे म्हणजे माझ्या मनाला भुरळ पडते.

दुपारी डॅन्यूबचे दर्शन झाले होते. या लोकमातांच्या स्वरूपाने केवढे सांस्कृतिक शक्तिस्त्रोत मानवी इतिहासात निर्माण झाले आहेत! त्याची आठवण झाली म्हणजे मन त्यातच गुंतून जाते. मला केव्हातरी एक सुरेख लेख लिहावयाचा आहे. आज व्होल्गाच्या त्या गाण्याचे इंग्लिश भाषांतर मी करून आणविले. ते सोबत ठेवले आहे.

प्रागमधले विशेष ठिकाण म्हणजे त्यांचा - castle - कॅसल. त्याचे नाव आहे हरदचानिच (HARDCANY).

मी बाहेर असताना तिकडे बऱ्याच गोष्टी होऊन राहिल्या आहेत. राष्ट्रपतींचे नाव एकंदरीत कायम झाले. ६९ची आठवण आल्याशिवाय रहात नाही. गिरी आता काय करतात ते पहावयाचे. श्री. जत्ती यांची निवड चांगली झाली.