• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ६६

Link चे प्रश्नावर तडजोड नाही अशी भूमिका घेतल्यामुळे सर्व प्रश्नास धार आली. शेवटी तडजोड, वेळ देण्याबाबत करावी लागली. परंतु यू. एस्. ए. व जर्मनी यांना पुनर्विचार करण्याचे धोरण जाहीर करावे लागले. परिषद उधळली जाणार या कल्पनेने अलिवर्धनम् अस्वस्थ होते. परंतु शेवटी शेवटी मदत झाली म्हणून मुद्दाम आभार मानण्यासाठी सभेनंतर आवर्जून आले होते.

एक दिवस वेळ काढून ३५-४० मैलांवर येथील नेव्हल अकादमी पहावयास गेलो होतो. तेथे एक हिंदी प्रोफेसर भट्टाचार्य भेटले. तरूण मनुष्य आहे. त्याच्या ज्ञानाचा तेथे एका शाखेचा प्रमुख म्हणून उपयोग केला जात आहे. परंतु हिंदुस्थान शिपयार्डमध्ये त्याला तो मागत असताना नोकरी देण्याचा शहाणपणा आमच्या देशाने दाखविला नाही अशी त्याची तक्रार होती.

पहाण्यासारखी संस्था आहे. १८४७ पासून संस्था हळूहळू वाढते आहे. आज ४००० चे वर कॅडेट्स् आहेत. त्यांची लायब्ररी व अन्य हॉल्स पाहिले. शिक्षणाची आधुनिक साधने पाहिली. बऱ्याच दिवसांनी, जवळ जवळ दोन अडीच तास एकसारखा चालत राहिलो. शेवटी काहीसे थकल्यासारखे वाटले. पण वेळ मोठा आनंदात गेला.
परिषदेच्या कागदपत्रांपेक्षा अधिक काही वाचता आले नाही.

नेहमीप्रमाणे चार-पाच दिवसांनंतर घरची आठवण तीव्र होते व परतीची ओढ सुरू होते. तुम्हा सर्वांची आठवण येत आहे.

निघण्यापूर्वी चिरंजीव राजासंबंधी* आपली चर्चा झाली होती. तो प्रश्न सर्व प्रवासात माझ्या मनात एकसारखा घर करून आहे. त्याच्यासाठी काही केलेले नाही ही एकसारखी बोचणी आहे. तो बिचारा, माझ्यासारखा आहे. त्याची जर कुणी काळजी घेतली नाही तर त्याचे कसे होणार ही चिंता मला लागली आहे. कदाचित ही माझी चिंता अकारण असेल.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* चि.राजा (डॉ.विक्रम चव्हाण) हा यशवंतरावांचा पुतण्या. हा पुढे १९८३ मध्ये पुणे-सातारा मार्गावर अपघातात ठार झाला. – संदर्भ
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------