• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ५८

२७
२५ सप्टेंबर, १९७३

आय्. एम्. एफ्. आणि जागतिक बँकेची ही चौथी बैठक आहे; जिला मी ओळीने हजर आहे.

आफ्रिकेच्या भूमीवरची ही पहिली बैठक आहे. त्यामुळे आफ्रिकन देशांमध्ये काहीसे औत्सुक्य व उत्साह दिसतो. काल केनियाचे अध्यक्ष जोमो केनियाटा यांनी या बैठकीचे मोठया इतमानाने व समारंभपूर्वक उद्घाटन केले.

आम्ही आमच्या विद्यार्थिदशेपासून या देशभक्ताचे नाव ऐकून होतो. पंडितजी व केनियाटा हे समवयस्क होते. केनियाटाचे आज वय अंदाजे ८४ असावे. परंतु त्यांची प्रकृती पाहून आश्चर्य वाटेल इतका त्यांचा उत्साह व दमदारपणा होता. आवाजात आत्मविश्वास व धारदारपणा होता.

या वयातले आपले तारुण्य जगातील प्रतिनिधींना पटावे म्हणून की काय ते आपल्या तरुण चौथ्या पत्नीसह समारंभास आले होते.

बैठक काल सुरू झाली. आज वेगवेगळया राष्ट्रांतर्फे स्टेटमेन्ट्स् होतील. बहुतेक प्रमुख राष्ट्रे आजच बोलतील असे दिसते.

यू. के., यू. एस्. ए., जर्मनी, फ्रान्स, इटली आणि हिंदुस्थान यांची आज भाषणे (स्टेटमेंट्स् ) होतील. आजच्या जगापुढील जी महत्त्वाची समस्या आहे (मॉनेटरी सिस्टिम) त्यावरची प्रमुख प्रतिक्रिया बैठकी पुढे पहिल्याच दिवशी येत आहे हे एका अर्थाने चांगले आहे.

एका वर्षाच्या या क्षेत्रांतील चर्चेवरून व त्यातील प्रमुख माणसांशी आलेल्या संबंधावरून असे वाटू लागले आहे की, हा प्रश्न प्रमुख राष्ट्रे सहजासहजी सोडवू देतील असे वाटत नाही.

अविकसित राष्ट्रांच्यातर्फे आपली भूमिका स्पष्ट मांडण्याची कामगिरी भारताला करावयाची असल्यामुळे थोडासा कडवटपणा स्वीकारावा लागतो. परंतु हे अपरिहार्य आहे.

'C 20' पुन्हा जानेवारीत वॉशिंग्टनमध्ये भरणार आहे.

संध्याकाळी आपल्या एम्बसीमध्ये रिसेप्शन आहे. हिंदुस्थानमधील येथील प्रमुख लोक भेटतील. येथे एक महाराष्ट्र-मंडळ आहे. ती मंडळी एक-दोन दिवसांत भेटणार आहेत.

येथून १०० मैलांवर असलेले एक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी जावे अशी एक सूचना आली होती. परंतु मी ती नाकारली. मोटारीचा प्रवास मला झेपणार नाही असे वाटते.