• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ५१

भारतीय sub-continent वर परस्पर संबंध अधिक निकट करून आपासांतील चर्चांमधून प्रश्न सोडविण्याची आमची नीति आहे. त्या बाबतीत आम्ही पुढाकार घेऊन अनेक प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना दृष्ट लागेल असे धोरण कोणाही प्रमुख राष्ट्राने अंगिकारले तर भारतीय जनता अस्वस्थ होते. भारतीय जनमानस या बाबतीत फारच जागृत असते असेही मी सांगितले.

मोठया राष्ट्रांनी - अमेरिकेने सुध्दा - ही गोष्ट जाणली पाहिजे. माझ्या या विचारावर त्यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. परंतु 'आय अंडरस्टँड' म्हणून हा प्रश्न तेथेच सोडला.

काल 'वुइल्यम् बर्ग' हे ठिकाण पाहाण्यासाठी १५० मैलांचा मोटारीने प्रवास केला. रविवार असल्यामुळे वेळ मोकळा होता.

अमेरिकेला फारसा इतिहास नाही. आता ते घडवीत आहेत यात शंका नाही. त्यामुळे २०० वर्षांपूर्वीचा त्यांचा इतिहास, त्या वेळची अमेरिका, शहरे, घरे, राहणी कशी होती याचे एक प्रदर्शनच आहे हे शहर.

काही जुनी घरे तशीच आहेत. काही पुनर्बांधणी करून 'कलोनिअल अमेरिका' कशी होती व स्वातंत्र्यसंग्राम कसा, कोठे झाला याची थोडी फार कल्पना येते.

बराच भटकलो. या निमित्ताने चालावयास मिळाले, याचाच मला आनंद झाला. थकेतोपर्यंत चाललो. तेही फार दिवसांनी. बाकी प्रेक्षणीय असे काही विशेष आहे असे मात्र मला वाटले नाही. तूर्त पुरे.