• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ४६

१९ सॅन्फ्रॅन्सिस्को

१ ऑक्टोबर, १९७२

काल दुपारी वॉशिंग्टनहून येथे पोहोचलो. अमेरिकेमधील अति सुंदर शहरांपैकी एक अशी या शहराची ख्याती आहे.

१९६४ साली पश्चिम किना-यावर लॉसएंजिलिस येथे मी काही दिवस काढले होते. त्या वेळीही त्या वेळचे भारतीय राजदूत (श्री. मेनन) आग्रहाने मला या म्हणत होते. परंतु जमले नव्हते. ख-या अर्थाने पॅसिफिक सागराच्या किना-यावरील एक रमणीय शहर आहे, यात शंका नाही.

सागराचे पाणी डोंगराळ भागात आत घुसून एक छोटासा उपसागर झाला आहे. त्याच्या आवतीभोवतीच्या टेकडयांवर शहर वसले आहे. शहराचे रस्ते बरेचसे चढउताराचे आहेत. तसे शहर दोनशे वर्षांचे आहे. फार जुना इतिहास नाही.

येथे पोहोचताच या शहराचे मेयॉर यांचे प्रतिनिधी विमानतळावर भेटले. एक छोटासा अनौपचारिक स्वागत-समारंभ करून सन्मानदर्शक 'Key of Sanfransisco' अर्पण केली.

शहाराची किल्ली पाहुण्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्याची येथे पध्दत आहे. ही किल्ली भली मोठी आहे. मी त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा दोनशे वर्षांपूर्वी येथे पहिले चर्च बांधले, त्या चर्चच्या किल्लीची ही प्रतिकृति आहे असे त्यांनी सांगितले.

सर्व शहरभर भटकलो. नवी अमेरिका तिच्या उंच इमारतींच्या रूपाने वाढते आहे यात शंका नाही. पण जुन्या मेक्सिकन, स्पॅनिश संस्कृतीचा ठसा दिसेल असा, शहराचा काही विभाग आहे. चिनी लोकांची येथे बरीच वस्ती आहे. 'चायना टाऊन' म्हणून येथे एक प्रसिध्द विभाग आहे. हे सर्व लोक कम्युनिस्ट चीनचे विरुध्द आहेत असे दिसते. कारण काल त्यांचे पेकिंग-राजवटीविरुध्द एक निदर्शन होते. आज कम्युनिस्ट चायनचा राष्ट्रीय दिन आहे. त्या निमित्ताने व जपान आणि चीनच्या नव्या मैत्रीच्या निषेधार्थ हे निदर्शन योजिले होते. मला तर हे सर्व अवास्तव व कृत्रिम वाटते. परंतु त्यांचा प्रश्न आहे.

शहराच्या वेगवेगळया भागांना जोडणारे पूल आहेत. हे पूल म्हणजे प्रचंड, अतिप्रचंड अशा शब्दांनी वर्णन करावेत असे आहेत.

'गोल्डन गेट ब्रीज' वरून आम्ही पलीकडे गेलो. एक नमुनेदार म्हणजे एकदम वेगळया पध्दतीचे कलाकेंद्र पाहिले. (आर्टस् सेंटर). ४०-५० कलाकार येथे राहतात किंवा काम करतात. सरकारी मदत घेत नाहीत. शिल्प-चित्रे व इतर अनेकविध कलाकृति, सर्व आपली साधने हातांनी बनवून तयार करतात.

नृत्याचे व इतर कलांचे शिक्षण घेण्यासाठी शेकडो लोक - स्त्रिया - पुरुष - आठवडयात एक-दोन वेळा त्यांच्या सोयीप्रमाणे येतात.

आम्ही गेलो त्या वेळी एका मोठया खोलीमध्ये विविध तऱ्हेने सजलेल्या स्त्रियांचे नृत्याचे शिक्षण चालू होते. मला त्यांच्या वेषभूषेवरून सिनेजगतातील स्त्रिया असाव्यात असे वाटले. केंद्राचे डायरेक्टर - एक तल्लख तरुण अमेरिकन स्त्री-बाईंना तसे विचारलेही. परंतु तिने No-No असे डोळे विस्फारून आश्चर्य व्यक्त करून सांगितले.