• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ३०

नंतर आम्ही ढगांवर चढलो. पांढ-या शुभ्र ढगांनी आसमंत भरून गेले होते. त्यावरून आमचा राजवाडा तरंगत चालला होता. सूर्याच्या कोवळया किरणांनी आमच्या विमानाची प्रतिछाया ढगावर फार सुरेख पडली होती. सप्तरंगी वर्तुळाकार व त्याच्यामध्ये माशाच्या आकाराची विमानाची पडछाया, वेगाने पुढे पुढे चालली होती. जणू काही भला मोठा देवमासा समुद्रातून वेगाने पाणी तोडीत चालला होता!

हे हृदयंगम दृश्य मी किती तरी वेळ पाहात राहिलो होतो. त्याच वेळी कानावर पडणारे पं. रविशंकरच्या 'मालकंस'चे आलाप मन उल्हासित करीत होते. थोडावेळ का होईना, यक्ष-किन्नराचे भूमिकेत गेल्यासारखे वाटले.

ढग मोकळे झाले आणि खाली पुन्हा युरोपची भूमी दिसू लागली. जिनेव्हा आणि आल्पसच्या पर्वतराजी, बर्फाच्छादित शिखरे, विस्तीर्ण सरोवरे आणि भोवतालची रेखीव हिरवीगार शेती. घनदाट आखीव बने. हे सर्व पहात केव्हा वेळ गेला हे कळले सुध्दा नाही. एकाएकी हवाई सुंदरीचा आवाज आला 'पेटिया बांधिजे'. (Fasten your belts) चा बोर्ड समोर लखलखला आणि विमान फ्रँकफर्टच्या विमानतळाच्या दिशेने उतरू लागले.

आता थोडे पॅरिससंबंधी.

अनेकांच्या मुखांतून, अनेक प्रवासवर्णनांतून, इतिहासाच्या ग्रंथांतून पॅरिससंबंधी ऐकले, वाचले होते. एक ऐतिहासिक व सुंदर शहर. युरोपीय संस्कृतीची एका अर्थाने राजधानी मानले जाणारे हे शहर. ख-या अर्थाने मी अजून पाहिले नव्हते ही खंत नाही म्हटले तरी कुठे तरी मनात राहून गेली होती.

शनिवार, रविवार हे दोन दिवस मी या दृष्टीने बरेचसे कारणी लावले. अर्थात् दोन दिवसांत तरी काय पाहणार म्हणा!

ज्या हॉटेलमध्ये मी उतरलो आहे. (Hotel De Crillon) हे येथील प्रख्यात व अगदी पारंपरिक फ्रान्सच्या ढंगात चालणारे आहे. पुढच्या महिन्यात इंदिराजीही याच हॉटेलमध्ये उतरणार आहेत. अमेरिकेच्या आधुनिक हॉटेल्सची छाया इतर देशांतील व आपल्या देशातील हॉटेल्सवर पडली आहे. परंतु येथील खोल्यांची आखणी, आतील फर्निचर, भिंतीवरील चित्रांची निवड संपूर्णत: वैशिष्टयपूर्ण आहे. एक सांगितले पाहिजे, या हॉटेलमध्ये चहा फारच सुंदर देतात.

काल मी येथील म्युझियम्स् पाहिली.

चित्रकलेचे स्वतंत्र म्युझियम आहे. फ्रान्समध्ये या प्रकारची ख-या अर्थाने सुरुवात झाली. त्या क्षेत्रांतील जगविख्यात चित्रकारांची चित्रे येथे आहेत. विशेषत: एक चित्रमाला फार आवडली. एका कॅथिड्रलचे एकाच दिवशी एकाच विशिष्ट ठिकाणाहून वेगवेगळया पाच वेळी, जसे कलाकाराच्या मनावर परिणाम झाले, ते यात चित्रित केले आहेत. एकच वास्तू एकाच माणसाला कसकशी वेगळी भासते याचे कलापूर्ण दर्शन यात होते.

अनेक मनोवेधक चित्रे येथे पाहिली. सर्व चित्रे पाहून त्यांची सूक्ष्मता समजावून घ्यावयाचे म्हटले तर एक एक म्युझियम काही आठवडे पहावे लागेल.

दुसरे प्रसिध्द म्युझियम. यात जुन्या शिल्पांचा खच्चून भरणा आहे. अतिशय इतिहासप्रसिध्द चित्रे आहेत. जगविख्यात मोना-लिसा या म्युझियमचे प्रमुख आकर्षक चित्र आहे. तसेच प्रसिध्द 'व्हेनिस' चा पुतळाहि येथेच आहे.

संध्याकाळी पॅरिसच्या प्रसिध्द सीन नदीच्या काठावरून मोटारीतून चक्कर टाकली. ही नदी या शहराच्या रचनेचे व व्यक्तिमत्वाचे खरे केंद्र आहे. कला आणि इतिहास या नदीच्या दोन्ही काठांवर वसली आहेत असे म्हटले तरी चालेल.