• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - २३

सधन गोरे देश न सांगता एकमेकांजवळ खेचले जातात. एकमेकांची बाजू घेतात. मदत करीत असतात. हे दोन्ही अगदी उघड स्पष्ट होतात. आम्ही बाकीच्या लोकांची बाजू घेत होतो. त्यांचे प्रश्न आमचे मानीत होतो. परंतु इतके करूनही काही अंतर राहातच होते आणि ते स्वाभाविक आहे. आमचा विशाल आकार, प्रचंड लोकसंख्या, असीमित अशी potential साधने यामुळे काही फरक जाणवतो हे मात्र खरे. हळूहळू राजकीय क्षेत्रातही याचे काही पडसाद भविष्यात उठण्याची अशक्यता नाही. या बाबतीत अधिक सखोल विचार व योजना करण्याची जरूरी आहे यात शंका नाही.

निकोसियाच्या तीन दिवसांच्या वास्तव्यात तीन चार ठिकाणी बाहेर जाऊन आलो. ही तिन्ही ठिकाणे समुद्र किना-यावर तीन दिशांना आहेत. त्यांचे त्यांचे ऐतिहासिक असे आपले स्थान आहे.

या देशात चारही बाजूला समुद्र आहे. परंतु पाऊस मात्र फारच कमी आहे. अधिकात अधिक पाऊस १५ इंच एवढाच पडतो. त्यामुळे दुपारी उन्हाळा चांगलाच जाणवला.

लिमासोल हे बंदर दक्षिण किना-यावर आहे. येथे ब्रिटिशांचा आरमारी तळ आहे (Base). अजूनही १२००० ब्रिटिश लोक येथे राहतात. स्वातंत्र्यलढयाच्या काळची कटुता राहिलेली नाही असे येथील लोक सांगत होते.

लिमासोल येथे आम्ही गेलो त्या रात्री 'मदिरोत्सव' चालू होता. आपल्या देशात अशा उत्सवाचे नावही काढले तर केवढे मोठाले डोळे होतील नाही!

परंतु येथे सर्व थरांचे लोक, अधिकारी, तरुण स्त्री-पुरुष सामील होऊन मुक्तकंठ पीत होते. हा उत्सव सायप्रसमध्ये प्रत्येक सप्टेंबरमध्ये १२ ते २० साजरा होतो. ही ग्रीक परंपरा आहे म्हणतात. सर्वांना मुक्तहस्ते मदिरादान केले जात होते. हसत खेळत हिंडतांना प्रौढ दांपत्येही दिसली. तरुणांची तर आज पौर्णिमाच होती म्हटले तरी चालेल. रंगेलपणा उसळून आला होता. हातात हात घालून युवक फे-या मारीत होते, गळयात गळा घालून नाचत होते. हास्याची व आनंदाची लयलूट चालली होती. त्यात काहीही अश्लीलता दिसली नाही. यात मोकळेपणा होता. निरागसताहि. अशा मदिरोत्सवाचे चांदण्या रात्रीस ''यौवन पौर्णिमा'' म्हणू नये तर काय म्हणावे!

वेळ होता तो संपला. उद्या पुन्हा लिहीन.