• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - २०७

समारोप ...... आभार

‘विदेश-दर्शन’ हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा संकल्प सिद्धिस गेला याचे आम्हास समाधान आहे. या संकल्पसिद्धीसाठी बहुतांचे सहकार्य लाभले. सक्रीस सहाय्य झाले.

अॅड. ग. नी. जोगळेकर हे यशवंतरावांचे चहाते. त्यांनी मूळ हस्तलिखित वाचले आणि सांगितले की ग्रंथरूपाने हे सर्वच्या सर्व, जसेच्या तसे प्रकाशात आले पाहिजे. ते आणि त्यांचे मित्र श्री. पोपटलाल राठोड यांच्यामुळे केवळ कामाला प्रत्यक्ष गति प्राप्त झाली.

आमचे मित्र श्री. बाबूराव शेटे, यशवंतराव त्यांचा उल्लेख, सार्वजनिक बाबूराव असा करीत असत. विधायक कमासाठी कृतिशील सहकार्य करण्याबद्दल त्यांची ख्याती. त्यांनी या कामासाठी कृतिशील बळ उभें केले.

 साहित्यिक मित्र श्री. भा. द. खेर, श्री. शंकर पाटील, पत्रकार श्री. वरुणराज भिडे यांनी हस्तलिखित वाचले आणि सुयोग्य मार्गदर्शन केले.

 डॉ. ए. एम्. उर्फ बाळासाहेब देशपांडे यांनी त्यांच्या संग्रही असलेली परदेशातील मूळ छायाचित्रे मुखपृष्ठाच्या सजावटीसाठी उपलब्ध करून दिली. चित्रकार श्री. ग. ना. जाधव यांनी सिद्धहस्त कुंचल्याने सुरेख मुखपृष्ठ तयार केले. मुंबईच्या ‘धोटे प्रिंट्स अॅण्ड आर्टस्’ चे श्री. मनोहर धोटे यांनी मुखपृष्ठाची आकर्षक, सुबक छपाई करून दिली. या कामी श्री. अमृतराव पन्हाळे यांनी मोठे सहकार्य केले.

स्वस्तिक मुद्रणालयाचे प्रमुख श्री. अनंतराव रायरीकर यांची चिकाटी, जिव्हाळा आणि संकल्पित वेळेत काम पूर्ण करण्याची जिद्द यामुळेच हा ग्रंथ देखण्या स्वरुपात सिद्ध झाला. मुद्रणाचे सर्व श्रेय श्री. रायरीकर यांच्या वैयक्तिक दक्षतेला आहे.

यशवंतरावांची विदेश सफरीतील छायाचित्रे सौ. वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टचे चेअरमन श्री. रसिक शहा आणि विश्वस्त श्री. शामराव पवार यांनी उपलब्ध करून दिली.

ग्रंथाचा कळसाध्याय – या ग्रंथाची प्रस्तावना. प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे यशवंतरांवाच्या राजकीय क्षेत्रातील प्रगतीचे, कर्तुत्वाचे गेल्या अर्धशतकाहून अधिक काळचे जाणते साक्षीदार-साथीदार आहेत. ‘विदेश-दर्शन’ त्यांनी संपूर्ण वाचले आणि ‘सुरेख’ असा अभिप्राय दिला, तितकीच उत्तम प्रस्तावना लिहून त्यांनी उपकृत केले.

“विदेश-दर्शन – मराठी साहित्यातील एक उच्च दर्जाची साहित्यकृती” हा त्यांचा अभिप्राय. ‘विश्वकोश’ कर्त्या प्रगाढ विद्वानाचा हा मौलिक अभिप्राय मिळाला यातच यशवंतरावांचे साहित्यिक जेष्ठत्व सिद्ध होते.

कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे श्री. अनंतराव कुलकर्णी हे यशवंतरावांचे दीर्घकाळचे मित्र. प्रकाशन संस्थेची पन्नास वर्षांची वाटचाल या वर्षी ते पूर्ण करीत आहेत. ‘विदेश-दर्शन’ चे प्रकाशन याचवेळी होत आहे या योगायोगाचे त्यांनी मन:पूर्वक स्वागत केले आणि वितरणाची जिम्मेदारी स्वीकारली.

यशवंतराव चव्हाण यांचे पुतणे श्री. अशोक आणि कुटुंबियांच्या सौजन्याचा उल्लेख यामध्ये आवश्यक आहे. या सर्वांबद्दल कृतज्ञ आहोत ..... आभारी आहोत.

प्रकाशक-संपादक    

यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तित्त्वाचं वेगळेपण वैशिष्ट्यपूर्ण आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण, गृह, अर्थ आणि विदेश मंत्री. लोकसभेत अल्पकाळ विरोधीपक्ष नेते आणि अखेरीस देशाचे उपपंतप्रधान. श्रेष्ठ पदे भूषविणारे भारतीय नेते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील जेष्ठ नेते असतांना, १९६२ ते १९७७ या कालखंडातील राष्ट्रीय महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यात प्रामुख्याने सहभाग.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास. व्यापक अनुभव. विविध राष्ट्र प्रमुखांशी सलोख्याचे संबंध.

साहित्य, संगीत, काव्य, नाट्य, कलाप्रेमी, निसर्गप्रेमी. माणुसकीत भिजणारा माणूस. मनाने रसिक.

जगाचा प्रवास जागृत मनाने केला. चर्चा, विचार, अनुभव, शब्दबद्ध केले. तेच हे, त्यांना घडलेलं विदेश-दर्शन.