• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १७६

९० न्यूयॉर्क
६ ऑक्टोबर, १९७६

या पूर्वी लिहिले त्याला आठ दिवस झाले. मागे वळून पाहिले तर वाटते की, बाहेर येऊन काही महिने झाले आहेत. कामात मन गुंतले असले म्हणजे त्यात रमून जातो. पंरतु The Garlyle या ऐषारामी, सुरेख व निवांत हॉटेलमध्ये परत आले की, एकलेपण खावयास उठते.

वाचावयाचा प्रयत्न करतो परंतु कामकाजाचे इतके वाचावे लागते की, दुसऱ्या वाचनाकडे लक्षच लागत नाही. औषधे वेळेवर घेत असतो, त्यामुळे सुदैवाने अजून तक्रार नाही. श्री. श्रीपाद डोंगरे आणि श्री. शरद काळे दोघेही खूपच काळजी घेतात.

तुझी आठवण झाली की मात्र केविलवाणा होतो. कामाच्या व मोठेपणाच्या (?) घाईगर्दीत अगदी निकटच्या माणसाच्या भावना किती ताणलेल्या असतात याची दादही आम्ही लोक घेत नाही. काही गोष्टी गृहित धरण्याची सवय लागून जाते. तसे माझे काहीसे झाले आहे काय नकळे. परवा दिल्लीहून निघताना मी खाडकन् जागा झालो आहे. इतके दिवस तुला एकटे टाकून दूर जाण्याची गोष्ट यापुढे बंद!

यू. एन्. मध्ये रोज दोन ते पाच विदेशमंत्र्यांना स्वतंत्रपणे भेटतो. ही फार चांगली प्रथा आहे. संबंध ताजे होतात. नवीन अद्ययावत माहिती मिळते.

ता. ४ ला माझे निवेदन झाले.* माझ्याही मताने उत्तम झाले. एशिया सोसायटीचे भाषणाला बरेच बुद्धिवंत व उद्योगवंत आले होते. दुपारी व रात्री बाहेर जेवण घ्यावे लागते. नकार देण्याची सोय नाही. पण जपून घेत असतो.
------------------------------------------------------------------------------------------------------
* Key note speech at the thirty first session of the U.N. General assembly on October ४, १९७६ at Newyork. (परिशिष्ट पहा).
-------------------------------------------------------------------------------------------------------
प्रेसिडेंटच्या निवडणुकीची धामधूम आहे. पण ती सर्व टेलिव्हिजनवर! इतरत्र सर्व सामसूम असते. आपले निवडणुकीचे दिवस कसे गजबजलेले असतात तसे येथे नाही.

प्रे. फोर्ड की कार्टर? महिन्यापूर्वी कार्टर निवडून आले अशी परिस्थिती होती. आज तसे नाही. गेल्या आठवडयात जे काही अमेरिकन्स भेटले त्यांनी कार्टरच्या मोहिमेची शक्ति कमी होत चालली आहे असे सांगितले. पण कार्टरने पुन्हा याच आठवडयापासून जोम धरला आहे, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. सारांश आज कोणाबद्दलच हमखास बोलत नाहीत.

एक नाटक, 'कॅलिफोर्निका सूट' व एक सिनेमा 'पेपर टायगर' पाहिले. सामान्य!

एक दिवस (२ ऑक्टोबरला) वॉशिंग्टनला जाऊन आलो. येथे पाऊस पडत असतो. पाऊस पडला म्हणजे न्यूयॉर्क गंभीर व उदास दिसते. वॉशिंग्टन अगदी विरुध्द. मोकळया बागा, झाडे, मैदाने यामुळे वातावरण उल्हसित वाटते.

गांधी-सेंटरवर गांधींच्या जीवनावर बोललो. खूप गर्दीचा दिवस गेला. शटल् सर्व्हिसने सकाळी जाऊन रात्री न्यूयॉर्कला परत आलो. श्री. डोंगरे यांना बरोबर नेले होते. कारण त्यांची ही पहिलीच भेट आहे.

बांगला देशने विरोधी प्रचाराची फळीच उघडली आहे. सर्वत्र भेटून टीका-टीपणी चालू आहे. त्यामुळे बहुतेक सर्व प्रतिनिधींना मी भेटलो तेव्हा हा विषय हटकून निघतोच. मग सर्व तपशील पुन्हा पुन्हा सांगावा लागतो.

उद्या त्यांचे निवेदन आहे. काय काय पाजळतात ते दिसेलच. पण उत्तर द्यावे लागले तर त्याची तयारी असावी म्हणून मी उद्याच्या ऐवजी परवा म्हणजे ८ तारखेला रात्री येथून निघून या देशातील इतर शहरांचा दौरा सुरू करीन.