• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १६३

डच, अमेरिकन ऑस्ट्रेलियन अनेक चित्रकार येथे येऊन महिनो-महिने राहतात. एक दोन तर येथेच लग्न करून राहिलेत. एक विविधतेने फुललेली आर्टस् गॅलरी संध्याकाळी आम्ही पाहिली.

रात्रीचे जेवण येथील गव्हर्नरचे घरी होते. ऑफिसियल 'रेसिडन्स' बाली घराचे धर्तीवर आहे. तेथे साधे जेवण दिल्यावर नृत्याचा कार्यक्रम झाला.

तीस लोक वेगवेगळी वाद्ये एकमेळाने वाजवितात. वाद्यवृंदाची ही बालीतील कल्पना काही शतकांची जुनी आहे. गव्हर्नरने मला एक प्रेझेंट दिले. गरुडावर आरूढ झालेले श्री विष्णू यांचे बालीतील रूप! लाकडात कोरलेले आहे.

उद्या सकाळी आणखी एक कला-केंद्र पाहून जोगी-अकार्तासाठी निघणार आहोत.

एखाद्या रात्रीचा मुक्काम आणि चार सहा तासांची भटकंती एवढे बालीसाठी अपुरे आहे. काही दिवस राहून निवांतपणे पाहिले पाहिजे. पण केव्हा आणि कसे ?

येथील प्रवासात मी आणि डॉ. मलिक एकाच गाडीतून हिंडत असतो. तेव्हा औपचारिक जे बोलणे होत नाही अशा चर्चा निघतात.

कंबोडियाच्या प्रिन्स सिंहनाकची गोष्ट निघाली. अंतर्गत परिस्थितीचा त्यांना काही अंदाज आहे का ? असे मी विचारले. तेव्हा फारसा नाही असे म्हणाले. व्हिएटनामचे डे. मिनिस्टर नुकतेच येथे येऊन गेले. त्यांनाही काही अधिक माहिती आहे असे दिसले नाही असेही ते म्हणाले. मात्र एक मोठे मजेदार निवेदन त्यांनी केले. ते म्हणाले की, ''प्रिन्स सिंहनाकने पेकिंग लवकर सोडून दिले असते आणि पॅरिस किंवा असे कोठे तरी राहिले असते तर त्यांची आज जी दशा झाली आहे ती झाली नसती.''

मी म्हटले, ''परंतु त्यांच्याशी ज्यांनी दगलबाजी केली त्यांचेशी लढून, त्यांना पराजित करून, परत आपल्या भूमीत जनतेचा मित्र-सेवक, या नात्याने त्यांनी परत जाणे भूषणावह नाही का ?''

मलिक म्हणतात, ''कोण जाणे ? असेल कदाचित्. पण आता ते संन्यास (Monk) घेणार आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे आजच्या राजवटीविरुध्द निषेध (प्रोटेस्ट) व्यक्त करण्याचा तो एक मार्ग नाही का?''

एशियन आणि इंडो चीन समाजवादी राष्ट्रांतील नेते एकमेकांकडे आतल्या मनातून कसे बघतात त्याचा हा एक नमुना आहे एवढेच म्हणता येईल.