• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १४८

७५ अंकारा (Turky)
१ एप्रिल, १९७६

ता. ३१ ला, पाडव्याच्या मुहूर्तावर, नव्या वर्षाची सुरुवात या प्रवासाने केली आहे. वर्षभर चालणाऱ्या भ्रमंतीचा श्रीगणेशाच होतो की काय कोण जाणे! पॅन अमेरिकेने प्रवास बऱ्याच वर्षांनंतर केला. एअर इंडियाशी याची कसलीच तुलना होऊ शकत नाही. सहा तास तेहरानमध्ये थांबलो. अॅम्बॅसडर श्री. राम साठे यांचे घरी सर्वजण गेलो. चर्चा-चहा यांत बराच वेळ गेल्याने हा रस्त्यात वाट पाहणीचा काळ तसा कंटाळवाणा गेला नाही.

श्री. राम साठे खिलाडू माणूस आहे. श्री. जगमोहन 'फॉरिन सेक्रेटरी झाले हे उत्तम झाले. योग्यतेचे गृहस्थ आहेत ते असे' म्हणून दाखविले. त्यांच्या पदरात ही जागा आली होती. पण त्याची त्यांनी फार चर्चा केली. त्यांच्यासाठी सर्वजण कदाचित वाट पाहतील या भावनेने जून-जुलैमध्ये येण्याच्या गोष्टी केल्या. आणि त्यात ते हरले. त्यांनी बोलण्यात खिलाडूपणा दाखविला पण मला वाटते, त्यांच्या मनाला ही गोष्ट कायमची लागून राहणार. I hope I am wrong.

तेहरानमध्ये अंतर्गत गडबडी खूपच चालू आहेत. मध्यंतरी मंत्रिमंडळात झालेले बदल व त्या संबंधीचे अनेक किस्से ऐकले. घरोघरी त्याच चुली!

तेथून १॥ वाजता (भारतीय वेळ ३॥) निघालो व ४। वाजता इस्तंबूलला पोहोचलो. जगाच्या पाठीवरील हे एक विलक्षण ठिकाण आहे. भूगोलाने त्याला एक अनोखे वैशिष्टय दिले आहे. त्यामुळे या शहराभोवती इतिहास फार खेळ खेळला आहे.

आटोमन साम्राज्याची राजधानी हे एक उदाहरण झाले. युरोप-आशिया यांना प्रत्यक्षत: आणि ऐतिहासिक दृष्टयाही जोडणारा हा सेतू आहे. अनेक राज्ये - वंश - भाषा यांचा हा ऐतिहासिक सेतू कित्येक शतके होता. त्याचे चिरंतन टिकणारे परिणाम आहेत.

कित्येक वर्षे स्वप्न होते की, हे शहर पाहीन. आज ते पाहिले. तीन तारखेला परत एक दिवसाच्या मुक्कामाला येथे राहीन तेव्हा बारकाईने किंवा सावकाशीने पाहीन.

तासभर चिनार हॉटेलमध्ये वेळ काढला. प्रवासाचा कंटाळा होता, परंतु झोप येत नव्हती. म्हणून सायंकाळच्या सूर्याच्या शीतल प्रकाशात Sea of Marmar कडे पहात चहाचे गरम घुटके घेत सर्व वेळ काढला.