• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १३९

७२ न्यूयॉर्क ते लंडन प्रवास
११ ऑक्टोबर, १९७५

खरे म्हणजे वॉशिंग्टनहूनच मी हे लिहावयास पाहिजे होते. पण जे अडीच दिवस आणि तीन रात्री वॉशिंग्टनमध्ये काढल्या त्या इतक्या गर्दीच्या आणि मनावरती ओझे असणाऱ्या होत्या की बसून चार ओळी लिहीन म्हटले असते तर ते शक्य झाले नसते.

जेव्हा थोडा वेळ मिळेल तेव्हा लिहावे असे योजले होते. म्हणून आता मध्यरात्री लिहिण्यास सुरूवात केली आहे.

एअर-इंडियाचे हे 'विक्रमादित्य' तीन तास उशीरा न्यूयॉर्कमधून निघाले. काही मिनिटांपूर्वी तारीख बदलली आहे. अर्थात् उद्या लंडनला तीन तास उशीरा पोहोचू. उदयाच्या लंडनच्या विश्रांतीचे असे तसेच झाले म्हणाना! हल्ली-हल्ली एअर-इंडियाला काय झाले आहे कोण जाणे!

अमेरिकेच्या या भेटीतील हे महत्त्वाचे दिवस होते. इंडो-यू. एन्. जॉइन्ट कमिशनची लांबलेली - पुढे ढकललेली ही दुसरी बैठक गेल्या मार्चमध्ये होणार होती. परंतु दरम्यान अमेरिकेने पाकला शस्त्रपुरवठयाचा निर्णय जाहीर केला व त्यामुळे ती होऊ शकली नाही.

मध्यंतरी बरीच शब्दाशब्दी झाली. संबंध संपले की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु माझ्या मताने आणि मला वाटते, पंतप्रधानांच्याही मताने, अमेरिकेचे संबंध दुरावू नयेत. यात भारताचे हित आहे. जशी भारताला अमेरिकेच्या मैत्रीची गरज आहे त्याचप्रमाणे अमेरिकाही भारताला दुर्लक्षू शकत नाही.

व्यापार, आर्थिक क्षेत्रातील सहकार्य, विज्ञान व टेक्नॉलॉजी वगैरे क्षेत्रांत विचार व अनुभव यांची देवघेव होणे आवश्यक आहे. बंद झालेली बोलणी पुन्हा सुरू केली पाहिजेत.

दैनंदिन राजकीय चढउतारांचा फारस परिणाम होणार नाही अशी यंत्रणा सुरू करून तिच्या मार्फत हे सहकार्याचे कार्य सतत चालू राहील अशी व्यवस्था केली पाहीजे. या जॉइन्ट कमिशनची भूमिका ही आहे.

ही संस्थात्मक व्यवस्था कार्यशील राहिली तर भारत-अमेरिका संबंध सुधारण्यात एक पाऊल पुढे पडेल यात शंका नाही. मात्र एक काळजी घ्यावी लागेल. याबाबत ढोल पिटण्याचे टाळले पाहीजे. 'लोप्रोफाइल' ठेवले पाहीजे.
वॉशिंग्टनला जाण्यासाठी न्यूयॉर्कहून निघताना (रेल्वेत पाऊल ठेवताना) माझ्या मनात या विचारांनी गर्दी केली होती. मनावर एक प्रकारचे ओझे होते.

अमेरीकेतील माझा हा रेल्वेचा प्रवास पहिलाच होता. न्युयॉर्क ते वॉशिंग्टन तीन तासांचा प्रवास आहे. पुणे ते मुंबई डेक्कनक्वीनसारखा. अर्थात अंतर जास्त आहे. तुलनेने आजची (१५ वर्षांपूर्वीची नव्हे) डेक्कनक्वीन फारच मागे पडेल.