• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १३६

'ऑफ दि रेकॉर्ड' ज्या दोन सभा झाल्या त्या फक्त अमेरिकन्सच्या होत्या. निवडक व प्रातिनिधिक लोक होते. उद्योगपति, बँकर्स, प्रोफेसर्स, संपादक असे मिश्रण होते.

त्यांचे प्रश्न मला तरी सद्भावनेतून विचारल्यासारखे वाटले. त्यामध्ये हिंदुस्थानसंबंधी आपुलकी होती. त्यांच्या दृष्टीने काहीतरी नवीन घडत चालले आहे व ते चांगले नाही. वस्तुस्थिती काय आणि त्याची कारणे काय? ही प्रश्नांची दिशा होती.

आपल्या देशातील प्रथा व संस्था डोळयांपुढे ठेवून ते प्रश्न विचारीत होते. भारताची परंपरा - भूमिका व तेथील ज्वलंत प्रश्नांची प्राधान्यता यांचा संदर्भ लक्षात घ्यावयास ते तयार नव्हते. परंतु समजून दिल्यानंतर ते एवढे जरूर मान्य करीत होते की, हिंदुस्थानचे प्रश्न त्यांच्या मार्गाने त्यांनीच सोडविले पाहिजेत व त्यांच्या नेत्यांचा तो हक्क आहे. एक हुषार तरुण कायद्याचा प्रोफेसर माझ्या डिनर-मिटिंगचा अध्यक्ष होता. त्याने मोठा अर्थपूर्ण आणि मजेदार खुलासा केला. ''हिंदुस्थानबरोबर आमचा वैचारिक रोमान्स चालू होता. आणि त्यामुळे आमच्या काही अपेक्षा आम्ही तयार केल्या आहेत. त्या अपेक्षांचा भंग झाला की, प्रेमभंगाची तीव्रता जाणवेल.'' विदेशनीतिसंबंधानेही काही मूलभूत प्रश्न विचारीत असत.

दुपारी थोडा वेळ मिळाला तेव्हा येथे कित्येक वर्षे काम करीत असलेल्या रामकृष्ण मिशनला जाऊन आलो. येथे हल्ली प्रमुख असलेले स्वामी मराठी भाषिक आहेत. १९६०-६१ साली नागपूरला हे याच संस्थेचे तेथील प्रमुख होते.

उत्तम कार्य चालू आहे. शिकॅगो - रामकृष्ण मिशन - आणि विवेकानंद स्वामी ही त्रयी मनामध्ये लहानपणापासून घर करून बसलेली आहे. सर्व धर्मपरिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणांची वर्णने पहिल्यापासून ऐकलेली आहेत. त्यामुळे दिवसभर स्वामीजींची मूर्ति डोळयांपुढे येत होती.

हे शहर ४० लाख वस्तीचे, व्यापार व उद्योग यांचे केंद्र आहे. रेल्वेचे मोठे केंद्र पूर्वी होते. (आजही असेल). मिचिगन लेकच्या (सरोवर) काठी बसले आहे. अशी अनेक (५) सरोवरे एकमेकांस जोडून आहेत. शेवटी सेंट लॉरेन्स नदीची व त्यांची गेल्या वीस वर्षांपूर्वी गाठ घालून दिली आहे.

त्यामुळे अॅटलांटिकमधून मोठमोठी जहाजे शिकॅगोपर्यंत येतात. आता ते एक महत्त्वाचे बंदर झाले आहे. धान्याची - विशेषत: गव्हाची- ही मोठी बाजारपेठ आहे. शेतकामाची आधुनिक यंत्रे निर्माण करणारे अनेक मोठमोठे कारखाने त्यामुळे येथे आहेत. उत्तम शेती व चांगल्या शेतजमीनीसाठी हा भाग प्रसिध्द आहे. मिड्-वेस्ट म्हणतात तो हाच भाग किंवा त्याचा महत्त्वाचा हिस्सा असावा.

सकाळी ७ पासून रात्री १२ पर्यंत एकसारखा कामात होतो. आज सकाळी परत ५॥ ला उठून तयारीला लागलो आहे. ८॥ वाजता न्यूयॉर्कला जाणारे विमान गाठावयाचे आहे.

शिकॅगो नदीच्या काठी हे सुंदर हॉटेल (Hyat Regency Chicago) आहे. २६ व्या मजल्याच्या, नदीकडेच्या खिडकीतून संथ वाहणारी शिकॅगो दिसते आहे. अतिदूर मिचिगेन सरोवर दिसते आहे. प्रसन्न दृश्य आहे. सकाळचे ७ वाजलेत. पूर्वेकडे सूर्याचे लाल बिंब हळूहळू वर येत आहे. डोळयांपुढे स्वामी विवेकानंदांची तशीच तेजस्वी मूर्ति येत आहे. शिकॅगोची ही प्रतिमा मनात ठेवून प्रयाण करणार आहे.