• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १२३

तर रशियाने, मेंढराचे कातडे पांघरून मेंढरांच्या कळपात शिरणारा लांडगा असे चीनचे वर्णन केले! चीनच्या धोरणाचे हे वर्णन समर्पक आहे असे मला वाटले. हे मी मलिकना म्हटले.

त्यांनी दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या. (१) जागतिक शांततेचा पाया घातल्याशिवाय आर्थिक प्रगति अशक्य आहे. शस्त्रास्त्र-स्पर्धेमध्ये तीन हजार कोटी डॉलर्स खर्च होत आहेत. त्यामध्ये १० टक्के जरी कपात केली तरी अविकसित राष्ट्रांना कितीतरी मदत करता येईल. पीसप्रपोजल्सना प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांचे मत. हा मुद्दा मी माझ्या भाषणांत मांडला आहे असे मी त्यांच्या निदर्शनास आणले.

(२) दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे, रशियाला पूर्व व पश्चिम दोन्हींकडून, लष्करी वेढा पडला आहे. दक्षिणेकडून इराण, अरब राष्ट्रे (गल्फ प्रदेश) यांची शस्त्रास्त्र-वाढ. ही म्हणजे त्यांचे उदरच संकटात आणते आहे अशी मीमांसा मांडली. रशियाच्या आजच्या विचारावर-धोरणावर प्रभाव टाकणाऱ्या या गोष्टी आहेत यात शंका नाही.

यू. के. चे. विदेशमंत्रि भेटले. फार लहान मनुष्य वाटला. प्रिन्स चार्ल्सची भारत-भेट पुढे ढकलण्याचा निर्णय इमर्जन्सीमुळे, आम्ही घेत आहोत असे म्हणाले. आमच्या अंतर्गत प्रश्नाबाबत त्यांनी असे काही मत व्यक्त करणे युक्त नाही. राजपुत्र आला किंवा न आला याचे आम्हाला काडीमात्र महत्त्व नाही. परंतु यू. के. चे धोरण युक्त नाही हे मी स्पष्ट केले. परंतु त्यांचा हा निर्णय दिसतो.

लेबर पार्टीचे नेतृत्व कद्रु मनाचे व अदूरदृष्टीचे आहे - निदान हिंदुस्थानबाबतीत - असे माझे पूर्वीपासूनचे मत आहे.

१९४५-४६ मध्ये अॅटली नसते तर इतिहासाची पावले कदाचित वेगळी पडली असती असे वाटू लागते. व्यक्ती-व्यक्तीचा फरक इतिहासाच्या दिशा बदलू शकतो हे काही प्रमाणात किंबहुना बऱ्याच प्रमाणात खरे आहे असे यामुळे मला वाटू लागले आहे.

या निमित्ताने, १९६४ साली मी इंग्लंडच्या भेटीस गेलो असताना सेव्हॉय हॉटेलमध्ये दिलेल्या रात्रीच्या भोजनाला अॅटली आपुलकीने व त्या वृध्दावस्थेत आल्याची आठवण कृतज्ञतापूर्वक झाली. हा आठवडा कसा गेला ते समजले नाही. रिच इन् एक्स्पीरिअन्स! खूप समजले व बरेच शिकलो.

न्यूयॉर्क, वॉशिंग्टनपेक्षा खूपच वेगळे शहर आहे. पुणे व मुंबईचा फरक येथे जाणवतो. (मला वाटते मी पूर्वी हे लिहिले आहे.) कुठल्याही महत्त्वाच्या शहरात गेल्यानंतर तेथील म्युझियम्स, बुक-शॉपस्, थिएटर्स व नदीकाठ पाहिल्याशिवाय ते शहर पाहिल्यासारखे वाटत नाही. या खेपेला वेळात वेळ काढून शॉपिंग सेंटर्स पाहून घेतले. तुझ्यासाठी स्वस्तातली, पण मला आवडलेली एक पर्स मी घेतली आहे. तुला आवडेल की नाही कोण जाणे? श्री. शरद उपासनी एक दिवसासाठी वॉशिंग्टनहून मुद्दाम आले होते. खुषीत दिसले. येथील P. R. श्री. जयपाल हे फार चांगले गृहस्थ आहेत. सर्वच तरुण अधिकारी बुध्दिमान व मोकळे वाटले. माझे हे आठ दिवस कामात व आनंदात गेले त्याचे श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे. शरद काळे व रमेश मुळे यांची फार मदत झाली.

मध्यरात्री, विमानाच्या प्रवासात हे लिहीत आहे. डोळयांत झोप आहे. विमान हलते आहे, बाहेर अंधार आहे. खाण्याचे उत्तम पदार्थ समोर आहेत अशा वातावरणात हे लिहीत आहे.

नाही म्हटले तरी देशात कशी परिस्थिती आहे व राहील याची जरूर चिंता आहे. निर्धास्त मनाने व विचारपूर्वक पावले टाकण्याचा निर्णय आहे. परिणामाची पर्वा नाही. फक्त प्रार्थना आहे की, देश सुखरूप रहावा. जनताजीवन सुखी व्हावे.

म. गांधींचा हिंदुस्थान त्यांना कृतज्ञ राहावा.