• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १२०

पहिल्या दिवशी यू. एस्. ए. चे मार्फत डॉ. किसिंजरचे भाषण, त्यांचे प्रतिनिधी श्री. मोनिहान यांनी वाचले. त्यांच्या धोरणात इष्ट तो बदल दिसतो. त्यांनी परिषदेपुढे असलेल्या सर्व प्रश्नांवर आपली अधिकृत धोरणे तपशीलवार मांडली व सहकार्याची भूमिका घेतली.

सामान्यपणे या भाषणाचे प्राथमिक स्वागत झाले. Opec देश-तेलवाले-आपली प्रतिक्रिया काय देत आहेत ते पहावयाचे आहे.

हे सर्व सांगितल्यावर सुध्दा हे नमूद केले पाहिजे की, यू. एस्. ए. च्या विधायक वाटणाऱ्या सूचनांतील पेच सावधानपणे तपासावे लागतील. त्यात त्यांची काही Reservations and conditions आहेत. विशेषत: त्यांचा खरा भर Tran-snational corporations आणि खाजगी भांडवल (Private capital) यावर आहे. त्यांच्या मताने These are the effective organs of development. तत्त्वत: ही भूमिका आम्हाला मान्य नाही. ही गोष्ट माझ्या भाषणात यू. एस्. ए. चा उल्लेख न करता स्पष्ट केली आहे.

काल चीनचे भाषण झाले. त्यांच्या परराष्ट्रनीतीचे सर्व डावपेच त्या भाषणात आहेत. अमेरिका व रशिया यांच्यावर टीका आहे परंतु यू. एस्. एस्. आर. वर अत्यंत कडवा हल्ला आहे.

काल संध्याकाळी Equus हे ब्राडवेवर हल्ली प्रसिध्द असलेले नाटक पाहिले. नवीन तऱ्हेचा अत्यंत गंभीर विषय - पण सूक्ष्मपणे व कुशलतेने दाखविला आहे. रंगमंचावर देखावे नव्हते. साधी रचना होती. नाटकाचे यश कलाकारांच्या वैयक्तिक कौशल्यावर व टीम-वर्कवर आधारलेले आहे.
 
नाटकानंतर Gay Lord या भारतीय रेस्टॉराँमध्ये तंदुरी बिर्याणीची चव घेतली. त्यामुळे एकंदर संध्याकाळ एकदम खूष गेली.

आता यू. एस्. एस्. आर. चे भाषण झाले. अपेक्षेप्रमाणे चीनवर त्यांनी जोरदार हल्ला केला. त्यांच्या टीकेला साधार उत्तरे दिली. विकसनशील देशांच्या प्रगतिसाठी केलेल्या प्रयत्नांचा तपशील दिला.

मेंढराचे कातडे पांघरून त्यांच्या कळपात शिरलेल्या लांडग्याचे उदाहरण देऊन डेव्हलपिंग देशांच्या कळपात, त्यांच्यापैकी एक म्हणून शिरला आहे अशी धोक्याची सूचना नाव न घेता दिली.

यु. एन्. मधील या दोन शेजाऱ्यांचे हे सख्त संभाषण त्यांच्या हल्लीच्या संघर्षाचे वास्तव दर्शन आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांत अनेकांना भेटणे, आणि महत्त्वाची भाषणे ऐकणे यामुळे मला येथे काल संध्याकाळचे नाटक सोडून फारसे फिरता आले नाही. पहाताही आले नाही. उरलेल्या दोन-तीन दिवसांत काही करता आले तर पहाणार आहे.

श्री. शरद उपासनींचा सकाळी वाशिंग्टनहून फोन आला होता. ५ ला ते येथे येतील असे दिसते.

प्रकृति उत्तम. येथील व्यवस्थाही मला पसंत आहे.