• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ११४

कागद उघडून पाहिला तर फ्रेंच प्रेस सव्हिर्सच्या प्रतिनिधीने कळविले होते की आत्ताच लिमामध्ये coup d'etat झाला आहे. तुमची प्रतिक्रिया काय आहे वगैरे.

चिठ्ठी वाचून सर्व अवाक् झाले. दोन-तीन मिनिटांत सर्व प्रतिनिधींना कळले. मला पाठविलेल्या चिठ्ठीत* लिहिले होते-

Mr. Chavan,

We have just been informed that there is a coup d'etat here in Lima. We would like to know-
१) Whether there is any reaction among ministers here,
२) Whether you and your colligues are likely to stay on or not.

Thank you,
No comments*
29-8-75
-----------------------------------------------------------------------------------------------
* चिठ्ठीतील मजकूर प्रेस प्रतिनिधीचा असून त्यावर 'No comments’ असे यशवंतरावांनी लिहिले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------
मी जेव्हा ही चिठ्ठी वाचली त्याचवेळी कोणी प्रमुख अधिकारी, चेअरमन, लिमाचे विदेशमंत्रि यांच्या कानाशी लागले आणि ते चटकन उठून निघून गेले. युगोस्लाव्हियाचे श्री. मिलिच आणि आम्ही चार-पाच एकत्र जमलो व परिषदेचे कार्य आपण काही बदल न करता शांतपणे चालू ठेवले पाहिजे असे ठरविले. तसे ते चालू राहिलेही.

पण प्रतिनिधींमध्ये गटागटाने चर्चा सुरू झाल्या. काय नेमके झाले आहे आणि ते कसे झाले आहे, सरकारच्या धोरणात बदल होणार का? ही महत्त्वाची परिषद सुरू असताना मुद्दाम नेमकी ही वेळ राज्यक्रांतीसाठी निवडली याचा अर्थ काय? विदेशमंत्र्यांचे भवितव्य काय? पेरू सरकारने Non alligned धोरणाचा त्याग केला तर परिषदेचे काय वगैरे स्वाभाविक प्रश्न मनात येऊन गेले.

परंतु हे सर्व शांतपणे व विदेशमंत्र्यांच्या परिषदेला शोभेल अशा Dignity ने चालले होते. कोठेही सभागृहात धावपळ, गडबड नव्हती. गंभीर चेहरे, जणू काही झालेलेच नाही या आविर्भावाने सभेचे काम चालू राहिले.

१॥ वाजता मला ऑस्ट्रिलिट मंत्र्यांच्या लंचला हॉटेलमध्ये यावयाचे होते म्हणून परतलो.

लंचच्या वेळी स्वाभाविकपणे याच चर्चा चालू होत्या. (हळूहळू बातम्या येत होत्या.) परंतु शहरातील सर्व व्यवहार शांतपणे चालू होते. जणू काही घडलेलेच नाही!

लिमामध्ये प्रतिनिधित्व करणारे वेस्टर्न गव्हर्नमेंटचे काही राजदूत हजर होते. त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की नवा बदल 'उजवा' आहे. किती उजवा आहे, हे सांगणे अवघड आहे. प्राईम मिनिस्टरने कमांडर ऑफ चीफ आणि वॉर मिनिस्टर आहे त्यांनी हे घडविले आहे. ते अजून लिमाचे बाहेर आहेत.

पेरूच्या विदेशमंत्रालयामधील एक उच्चपदस्थ जेवणासाठी निमंत्रित होते. ते वेळेबरहुकूम आल्यानंतर या चर्चा आम्ही बंद ठेवल्या व इतर गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. जेवण संपत आले असताना त्यांना हॉटेल-नोकराने कानाशी निरोप सांगितला. त्यांनी होस्टची क्षमा मागितली आणि National duty is first, I must go. म्हणून ते घाईघाईने निघून गेले.